The snare of chatting from a dating app read full story 
विदर्भ

‘डेटिंग ॲप’वरून चॅटिंगचा फास; खासगी बाबी व्हायरल करण्याची तरुणांना धमकी

अनिल कांबळे

नागपूर : क्षणिक सुखासाठी तरुणाई विविध ‘डेटिंग ॲप’चा वापर करातात. ‘चॅटिंग’ करणाऱ्या मुलींच्या प्रेमळ संवादाच्या मोहात अडकत असल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. प्रेमळ संवादातून तरुणांवर भुरळ घालत या मुली त्यांना अगदी खाजगी बाबीपर्यंत घेऊन जात आहेत. मुलांना नको त्या बाबीसाठी उत्तेजित करून त्याचे रेकॉर्डिंग केले जाते. चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंगद्वारे एकदा मुलांचे आपत्तीजनक फोटो, व्हिडिओ तयार झाले की ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना खंडणीची मागणी करीत असल्याच्या तक्रारी सायबर क्राईमकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे डेटिंग ॲपची विकृती अनेकांंचे संसार उद्ध्वस्त करण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोबाईलवर अनेक ॲप्सद्वारे डेटिंग आणि चॅटिंग करण्यासाठी तरुणींचे प्रोफाईल तयार आहेत. सुंदर, मोहक फोटो बघून अनेक तरुणांसह विवाहित त्यांच्या जाळ्यात अडकतात. ॲप डाउनलोड करताच आपले प्रोफाईल आयडी बनवले जाते. त्यात फोटो, नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदविला जातो.

नंदनवन परिसरात राहणारा २१ वर्षीय युवक चेतन (काल्पनिक नाव) याने २५ नोव्हेंबरला एक डेटिंग ॲप डाऊनलोड केले. त्याला सिमरन नावाच्या मुलीने मॅसेज केला. तिने एमबीबीएस करीत असून, सिंगल असल्याचे सांगितले.

दोघांचाही ॲपवरून संवाद सुरू झाला. तिने व्हॉट्सॲप नंबर दिला. त्यावरून दोघेही चॅटिंग करीत असतानाच सिमरनने तिसऱ्याच दिवशी चेतनला व्हिडीओ कॉलिंगची ऑफर दिली. २७ नोव्हेंबरला सायंकाळी व्हीडीओ कॉल केला. तिने अगदी कमी कपडे घातले होते. दोघांचे काही वेळ बोलणे झाले.

तिने आई आल्याचा बहाणा सांगून कॉल कट केला. रात्री पुन्हा तिने चॅटिंग करीत त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला. २८ नोव्हेंबरला तो रूममध्ये एकटा असल्याची संधी साधून सिमरनने त्याला न्यूड कॉल करण्याची ऑफर दिली. तिने आपत्तीजनक अवस्थेतच त्याला कॉल केला आणि चेतनलाही ‘तशा’ कॉलसाठी प्रवृत्त केले. 

आपत्तीजनक व्हिडिओ आणि खंडणी

सिमरनने लगेच चेतनला रेकॉर्ड केलेला त्याचा आपत्तीजनक अवस्थेतील व्हिडिओ पाठवला. त्याला १० हजार रुपयांची मागणी केली. चेतनने पैसे देण्यास नकार देताच सिमरनने तो व्हिडिओ चेतनच्या बहिणीच्या आणि काही मित्रांच्या फेसबुकवर टॅग केला. त्यामुळे चेतन घाबरला. त्याने लगेच पैसे देण्याची तयारी दर्शविली. सिमरनने गुगल पे नंबर दिला. चेतनने २ हजार रुपये तिच्या खात्यात टाकले. 

बहिणीने दिला धीर

चेतनशी बोलल्यानंतर खरा प्रकार बहिणीच्या लक्षात आला. तिने धीर देत चेतनला सायबर पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिसांनी चेतनला समजून घेत तक्रार नोंदवली. तसेच पैसे भरलेल्या बॅक अकाउंटची माहिती घेतली. पुढील प्रक्रिया आणि तपास सुरू केला.

तक्रारी सायबल क्राईमला प्राप्त
आपत्तीजनक स्थितीतून व्‍हिडिओ कॉलिंग केल्यानंतर खंडणी मागितल्याच्या काही तक्रारी सायबल क्राईमला प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकरणात घाबरू नये. ब्लॅकमेलिंगला थारा न देता पैसे पाठवू नये. अन्यथा वारंवार ब्लॅकमेलिंग करून खंडणी द्यावी लागू शकते. लगेच सायबर क्राईममध्ये तक्रार करा. घडलेला प्रकार न लपवता पोलिसांकडे व्यक्त व्हा. 
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

 हे लक्षात ठेवा 

  • डेटिंग ॲप किंवा फेसबुकवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका
  • फेसबुक व इतर सोशल नेटवर्किंग साईटवर आपली प्रायव्हसी सिक्युवर ठेवा
  • डेटिंग ॲप/फेसबुकवर सहसा आपली संपूर्ण माहिती उघड ठेवू नका
  • फ्रेंड लिस्ट हाईड करून ठेवा
  • प्रोफाईल लॉक करा
  • कोणत्याही अमिषाला बळी पडू नका

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT