Social Responsibility in Jopasale Business by Aruna Salve 
विदर्भ

Great : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायचं अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम निपटून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी सांभाळायची. अशावेळी अडलेल्यांना विनामूल्य जेवण देत सामाजिक दायित्व जोपासायच. धानापुरात अरुणाताईंची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

गोंडपिपरी तालुक्‍यातील धानापूर येथील दिलीप साळवे यांची अहेरी-चंद्रपूर मुख्य मार्गावर तेरा एकर शेती आहे. अनेक वर्षे शेती सांभाळताना त्यांनी शेतातच ढाबा सुरू केला. सुरुवातीला त्यांनी ही सारी जबाबदारी पेलली. पण, काही कारणास्तव हा सारा भार त्यांची पत्नी अरुणा सावळे यांच्यावर आला.

तेरा एकर शेतीत धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करायचं. यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी अन्‌ मग ढाब्यात स्वयंपाक बनविण्यापासून तर सारच नियोजन करायचं.

रात्री उशिरापर्यंत स्वयंपाकाचे काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायचे. हा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या धाब्यातील गावठी कोंबड्याच चिकन अतिशय लोकप्रिय आहे. बल्लारपूर, आल्लापल्लीपासून चिकनचा आस्वाद घेण्यासाठी या धाब्यावर खवय्ये येतात. मुख्य मार्गावरील अनेक अडलेल्या प्रवाशांना त्या विनामूल्य जेवण देतात.

प्रत्येक दिवसातून असे अनेक प्रसंग येतात. परंतु, आम्ही कधी पैशाचा हिशोब करीत नाही. माणुसकीच्या भावनेतून आम्ही अशा अडलेल्या, भुकेल्यांना विनामूल्य जेवण देत असल्याचे ते सांगतात. दहा वर्षांपासून व्यवसायातून सामाजिक दायित्व जोपासण्याचे त्यांचे अविरत कार्य सुरू आहे.

सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्‍यक असते. यातूनच प्रत्यक्षात ती साकारली जात असते. अरुणा साळवे यांनी याचाच प्रत्यय दिला आहे. महिला असूनही तेरा एकर शेतीच्या नियोजनासह प्रचंड चालणाऱ्या धाब्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अरुणाताईंची ही वाटचाल अनेकांना प्रेरणेची शिदोरी ठरली आहे.

सासूंचीही मदत

अरुणाताईंच्या सासू विठाबाई यांची त्यांना मोठी मदत मिळते. दुसऱ्या सासू शोभा वडस्कर या अंगणवाडी सेविका आहेत. पण त्याही आपली नोकरी पार पाडून पूर्णवेळ अरुणाच्या मदतीसाठी तत्पर असतात. अरुणा यांचे पती दिलीप साळवे, सासरे हरिश्चंद्र साळवे, दीर विपील घाटे हे सार कुटुंब त्यांच्या मदतीला पूर्णवेळ असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT