solar streetlight closed within three to four months in amravati 
विदर्भ

अधिकारी, कंत्राटदाराने पाडला सौरदिव्यांचा 'उजेड', अध्यक्षांनी कनिष्ठ अभियंत्याची काढली खरडपट्टी

सुधीर भारती

अमरावती :  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये 15 वित्त आयोगांतर्गत लावण्यात आलेले सौरदिवे अतिशय निकृष्ट दर्जाचे लावण्यात आले आहे. काही दिवे तर लावल्यानंतर तीन ते चार महिन्यांतच बंद पडले आहे. विशिष्ट साहित्य खरेदीसाठी कनिष्ठ अभियंत्यांकडून आग्रह केला जात असल्याचा गंभीर आरोप खुद्द जिल्हापरिषद अध्यक्षांनी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अध्यक्षांनी या मुद्द्यावर संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

जिल्हापरिषदेच्या स्थायी समितीची सभा सुरू होताच अध्यक्ष बबलू देशमुख यांनी इतर मुद्द्यांसोबतच सौरदिव्यांचा मुद्दा चर्चेला घेतला. 15 वित्त आयोगाच्या निधातून अनेक सदस्यांनी सौरदिव्यांची कामे हाती घेतली आहेत. संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांकडून कंत्राटदाराच्या आग्रहास्तव विशिष्ट कंपनीचे खांब तसेच इतर साहित्य घेण्याचा आग्रह ग्रामपंचायतींना करण्यात येत आहे, असा थेट आरोपच अध्यक्षांनी केला. याबाबत अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण व्यवहारात आर्थिक उलाढाल झाल्याचाही सदस्यांचा आरोप होता.

कनिष्ठ अभियंता किरण नितघसे यांनी याबाबत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. ही कामे आयएसआय मार्कच्या साहित्यातूनच केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यावर अध्यक्ष तसेच सदस्यांचे समाधान झाले नाही. धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील पळसखेड येथे सुद्धा पाच महिन्यांपूर्वी लावण्यात  आलेले सौरदिवे बंद पडल्याचा आरोप नितीन गोंडाणे यांनी केला. तीर्थक्षेत्र बहिरम येथील जत्रेच्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून काही लोकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्याचा मुद्दा सुद्धा चर्चेला आला. याशिवाय सिद्धनाथपूर व वडाळा येथे सिंचन विभागाकडून लावण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत असल्याची तक्रार रवींद्र मुंदे यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

जिल्हापरिषदेच्या काही विभागांमध्ये बीलो टेंडर काढले जात असून त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. कोणत्याही कंत्राटदाराला कामे करताना 5 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खर्च करता येत नाही. मात्र, नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवींद्र मुंदे यांनी केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता; पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाला सुवर्ण मयूर, ऋषभ शेट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

जन्मत:च राजासारखा थाट घेऊन येतात 'या' राशीचे लोक! सूर्यदेव देतात अफाट तेज अन् आत्मविश्वास

Zoho Share Dispute: घटस्फोटाचा वाद पोहोचला कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत; झोहोचे श्रीधर वेम्बू वादात; पत्नीचे गंभीर आरोप?

Raj Thackeray Dombivli : 'SIR प्रक्रियेवर लक्ष दिलं नाही तर जागा वाढवून काय फायदा?'; डोंबिवलीतून राज ठाकरेंचे मनसैनिकांना मोठे आदेश

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये लग्नसमारंभ सुरू असतानाच लष्कराचा बॉम्बहल्ला; पाच मुलांसह २१ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT