Son took extreme step as father misbehaved with him  
विदर्भ

वडिलांचा खून करून रात्रभर तिथेच झोपला; अखेर पोलिसांसमोर फुटले बिंग 

संतोष ताकपिरे

पथ्रोट (जि. अमरावती):  जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. दररोज गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत, अशीच एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट इथे घडली आहे. मुलाने बापाचा खून करून एक अख्खी रात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहासोबत झोपून काढली आहे. 

दारू पिऊन घरी आलेल्या मुलाला हटकल्याने त्याने वडिलांचा खून केला व रात्रभर तो त्यांच्या मृतदेहाजवळ झोपल्याची घटना गुरुवारी (ता. 15) भिलोना या गावात उघडकीस आली. बाळकृष्ण रमेश मालवे (वय 25), असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

रमेश मालवे हे गृहस्थ पत्नी व एका मुलासह तर त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह बाजूलाच वेगळा राहतो. बुधवारी (ता. 14) रमेश मालवे यांनी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणून घरी ठेवले होते. त्यांच्या गैरहजेरीमध्ये मुलगा बाळकृष्ण व्यसन पूर्ण करण्याकरिता ते धान्य विकून दारू पिऊन घरी आला, याची माहिती वडिलांना समजताच त्यांनी त्याला हटकले. 

त्याने रागाच्या भरात लाकडी झिल्पीच्या साह्याने त्यांचा खून केला, एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याठिकाणी रात्रभर झोपला. आज सकाळी मोठ्या भावाला वडील घराच्या बाहेर दिसून न आल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. 

त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता त्याला लहान भाऊ त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच झोपलेला दिसून आला. सुरुवातीला त्याने काहीच माहिती नसल्याचे सांगितले, त्यानंतर सदर प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

SCROLL FOR NEXT