soybean import increase in amravati apmc  
विदर्भ

नैसर्गिक आपत्तीनंतरही वाढली सोयाबीनची आवक, तीन लाख क्विंटलची तफावत

कृष्णा लोखंडे

अमरावती : यंदा अतिपावसाने खरिपातील सोयाबीनला तडाखा बसल्याने उत्पादनाची सरासरी घसरली. मात्र, तरीही गतवर्षीच्या तुलनेत सध्या येत असलेली आवक बघता फारशी तफावत आढळून आली नाही. वर्षातील अखेरच्या महिन्यात सोयाबीनची खुल्या बाजारातील आवक वाढली आहे. येथील बाजार समितीत डिसेंबर अखेरीस 6 लाख 97 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. विशेष म्हणजे, शासकीय खरेदी केंद्रावर या हंगामात केवळ 12 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

कोरोना संक्रमण व पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी खरीप हंगामात चांगलाच त्रस्त झाला. पेरणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने आधीच त्रासलेल्या शेतकऱ्यांना नंतर पावसाचा फटका सहन करावा लागला. जिल्ह्यातील 43 हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन अक्षरशः वाया गेले. हंगामाच्या अखेरीस काढणीनंतर सोयाबीन बाजारात आले. गेली दोन महिने शांत असलेल्या सोयाबीनच्या बाजारात डिसेंबरमध्ये मात्र तेजी आली. मध्य प्रदेशात सोयाबीनचे उत्पादन तुलनेने फार कमी झाल्याने राज्यातील सोयाबीनला मागणी वाढली व त्यामुळे हमीदराच्या तुलनेत खुल्या बाजारात भाव चढे मिळू लागले आहेत. त्याचा परिणाम शासकीय खरेदीवर झाला. शासकीय केंद्रांवर केवळ 12 क्विंटल सोयाबीन विकला गेला.

अमरावती बाजार समितीत आतापर्यंत या हंगामात 6 लाख 97 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली आहे. ऑक्‍टोबरमध्ये सुरू झालेल्या हंगामात 3 लाख 52 हजार 71 व नोव्हेंबरमध्ये 1 लाख 49 हजार 257 क्विंटल सोयाबीन आला. हमीदराच्या तुलनेत या सोयाबीनला चढे दर मिळालेत. हंगाम आटोपण्याच्या कालावधीत म्हणजे डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख 96 हजार 474 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सुपर दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षाही अधिक 4300 रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे.

आणखी सोयाबीन येणार -
गतवर्षी संपूर्ण वर्षभरात (एप्रिल ते मार्च) 10 लाख 29 हजार 261 क्विंटल सोयाबीनची आवक अमरावती बाजार समितीत झाली. यंदा हंगामाच्या सुरुवातीस तीनच महिन्यांत 6 लाख 97 हजार क्विंटल सोयाबीन आले. अद्याप हंगाम संपला नसून आणखी आवक येण्याची शक्‍यता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT