Soybean oil became Rs 136 per kg oil price news 
विदर्भ

किलोभर तेलासाठी दिवसभर गाळावे लागते घाम; गोरगरिबांना जीवन जगणे झाले असह्य

मनोज रायपुरे

वर्धा : जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे गोरगरिबांना जीवन जगणे असह्य झाले आहे. दिवसभर घाम गाळूनही गोरगरिबांच्या प्राथमिक गरजासुद्धा पूर्ण होत नाही. दैनंदिन आहारातील मुख्य घटक तेलाचे भाव गगनाला भिडले असून दररोज भाव वाढत आहे. ग्रामीण भागातील महिला मजुरांना एक किलो तेल खरेदी करण्यासाठी दिवसभर काम करावे लागते. 

दैनंदिन आहारात इतर वस्तू कमी जास्त असल्या तरी निभून जाते. मात्र, खाद्य तेल हा आवश्‍यक घटक आहे. इतर खाद्य तेलाच्या तुलनेत सोयाबीन तेलाचे भाव कमी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या तेलाला पसंती दिली. ८० टक्‍के नागरिकांच्या घरी याच तेलाचा वापर होतो. तर हॉटेल व्यावसायिकसुद्धा याच तेलातून खाद्यपदार्थ तयार करतात.

साधारणत: शंभर रुपये किलोच्यावर सोयाबीन तेलाचे भाव गेले नाही. सोयाबीन तेलाचा २८ रुपये किलोपासून प्रवास सुरू झाला. तो आज १३६ रुपये किलोवर पोहोचला आहे. दिवाळीपासून दररोज सोयाबीन तेलाचे भाव वाढत आहे. परिणामी, सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. किरकोळ बाजारात शेंगदाणा तेल १५६ रुपये किलो आहे. जवस तेल १४० रुपये किलो आहे.

ग्रामीण भागात कापूस वेचणीचेच काम सुरू आहे. महिला मंजुरांना प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने मजुरी मिळत आहे. एक महिला दिवसभरात आठ ते दहा किलो कापूस वेचणी करते. दिवसभराच्या मजुरीतून केवळ एक किलो तेल होत असल्याचे मजुरांनी सांगितले.

आधीच कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. नापिकीमुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हातालासुद्धा काम नाही. त्यातच तेलाचे भाव दिवसागणिक वाढत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्‍न गोरगरिबांना पडला आहे.

सोयाबीन नापिकीचा फटका

यंदा सोयाबीन पिकावर खोडकीडा आल्यामुळे सोयाबीनची नापिकी झाली आहे. एकरी एक क्‍विंटलसुद्धा सोयाबीन पिकले नाही. देशाअंतर्गत सोयाबीनची आवकसुद्धा ठप्प पडली आहे. तेल कंपन्यांकडे सोयाबीन नाही. याचा परिणाम तेलाच्या भाववाढीवर झाला आहे. सोयाबीन तेलासह इतर खाद्य तेलांचे भावसुद्धा वाढले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: मानलं संजू सॅमसन ! तापाने फणफणला होता, उपचार घेऊन हॉस्पिटलमधून थेट मॅच खेळायला आला अन्...

Viral Video : भटक्या कुत्र्यांपेक्षा यांचाच राडा! पोलिसांपुढंच रिलस्टार महिलेनं केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणाले तुम्हाला लाज...

Ring Road: गोल्डन रिंगरोडमुळे नागपूर होणार नवे आर्थिक केंद्र; चार ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्लाझा, १४८ किमी लांबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवात मुंबईतील 'या' ठिकाणांना भेट देऊ नका, पावसामुळे होऊ शकतो त्रास

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती घरी आणताय? मग 'हे' ७ नियम नक्की पाळा

SCROLL FOR NEXT