soybean seeds rate increases in amravati 
विदर्भ

शेतकऱ्यांनो! यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचे भाव भडकणार?

कृष्णा लोखंडे

अमरावती : यंदा खुल्या बाजारात सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी भावाचा परिणाम आगामी खरीप हंगामावर पडण्याची शक्‍यता आहे. या हंगामात बियाणे चांगलेच महागण्याची शक्‍यता असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाची चांगलीच कसरत होणार आहे. काळाबाजार रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचे विभागाने म्हटले आहे.

कमी कालावधीत व कमी खर्चात उत्पादन देणारे म्हणून सोयाबीनला पसंती दिल्या जाते. त्यामुळे गेल्या दीड दशकांत कापूस उत्पादक पट्ट्यात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. गतवर्षी मॉन्सूनचा अनियमितपणा व अतिपर्जन्य यामुळे सोयाबीनला चांगलाच फटका बसला. उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीही घसरली. चांगल्या (सुपर) दर्जाच्या सोयाबीनची वानवा गेल्याने खुल्या बाजारात भाव तडकले. त्याचा लाभ सरत्या हंगामातील शेतकऱ्यांना झाला. मात्र, आगामी हंगामात बियाण्यांसाठी वणवण होण्याची व अधिक पैसे मोजण्याची वेळ येणार असल्याचे शक्‍यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

गेल्या हंगामात चांगल्या प्रतीचे सोयाबीन सरसकट न विकता काही बियाण्यांसाठी राखून ठेवण्याचे आवाहन येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी शेतकऱ्यांना केले होते. फेब्रुवारी व मार्चमध्ये खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक बघता शक्‍यता कमी आहे. गतवर्षी 75 ते 80 रुपये किलोने बियाणे विकल्या गेले. अतिपावसाने चांगल्या प्रतीचा सोयाबीन कमी झाल्याने यंदा त्या दर्जाच्या बियाण्यांचा तुटवडा जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या सोयाबीनचे दर चढे राहणार आहेत, अशी शक्‍यता कृषी विक्रेत्यांनी वर्तविली आहे. त्यांच्या मते हंगामात चढ्या दराने खरेदीदारांनी सोयाबीन खरेदी केला. त्यामध्ये बियाणे उत्पादक कंपण्याचा समावेश अधिक आहे. ते कमी दरात बियाणे विकणार नाहीत.

तुटवडा व काळाबाजारावर नियंत्रणाचे आव्हान -
सोयाबीन बियाण्यांची मागणी व गेल्या हंगामातील स्थिती बघता यावर्षी बियाण्यांचा तुटवडा जाण्याची शक्‍यता आहे. किंबहूना ती निर्माण केल्या जाण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी तुटवडा व काळाबाजार यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे, त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT