विदर्भ

यवतमाळमध्ये उद्यापासून १५ दिवस कडक संचारबंदी; जाणून घ्या नियम

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना विषाणूच संसर्गामुळे (Coronavirus) आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूमुळे उद्‌भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना (Emergency services) करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पुन्हा 15 दिवस कडक संचारबंदी (Strict Lockdown in yavatmal) राहणार आहे. शनिवार (ता.15) ते एक जून असा कडक निर्बंधाचा कालावधी राहणार आहे. अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतंत्र आदेश काढला आहे.(Strict Lockdown in Yavatmal from 15 May to 1 june)

फेब्रुवारी व मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. बाधितांच्या संख्येसोबतच मृताचा आकडाही या कालावधीत वाढला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सहा एप्रिलपासून कडक निर्बंधाला सुरुवात झाली. रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नसल्याने टप्प्याटप्प्यात त्यात वाढ करण्यात आली. मे महिन्यात "ब्रेक दि चेन'अंतर्गत 15 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. कोरोना पूर्णत: आटोक्‍यात न आल्याने त्यात पुन्हा 15 दिवसांची भर घालण्यात आली.

कोणत्याही व्यक्तीला परराज्यांतून राज्यात कोणत्याही वाहनाने प्रवेश करण्यापूर्वी त्याच्याकडे 48 तासांपूर्वीच आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. कार्गो सेवेची वाहतूक करताना दोन व्यक्तींना (चालक, क्‍लीनर) यांनाही राज्यात प्रवेश करण्यापूर्वी कोविड चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणे आवश्‍यक करण्यात आले आहे. त्याचा कालावधी सात दिवसांचा राहणार आहे.

नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी शहरी व ग्रामीण बाजारपेठ व जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-19च्या नियमांचे पालन होत नाही, असे आढळून आल्यास सदर बाजारपेठ बंद करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयास करावी लागणार आहे. दूध संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया निर्बंधाशिवाय सुरू राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथरोगनियंत्रण अधिनियमाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दंडात्मक कारवाईसाठी पथके नियुक्त

नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात पोलिस विभाग व गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलिस विभागाने संयुक्त पथके नियुक्त करावीत, असे निर्देश आहेत. आदेशातील बाबींचा भंग झाल्याचे निर्दशनास येत असल्यास त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करता येणार आहे.

लग्न समारंभ पुढे ढकलले

एप्रिल महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यामुळे अनेक परिवारांनी पंधरा मेच्या पुढे विवाह सोहळे आयोजित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संचारबंदी एक जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

(Strict Lockdown in Yavatmal from 15 May to 1 june)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

Railway Employees Protest: रेल्वे आंदोलन परवानगीशिवाय! अहवाल मागवला; कारवाई होणार

Video : थाटात पार पडला जयवंत वाडकरांच्या लेकीचा साखरपुडा ! मल्याळी जावई आणि स्वामी समर्थांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT