कोंढाळी : बसच्या मागे धावाधाव करताना विद्यार्थी.
कोंढाळी : बसच्या मागे धावाधाव करताना विद्यार्थी.  
विदर्भ

कोंढाळी बसस्थानकावर अडकले शेकडो विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा

कोंढाळी/काटोल (जि. नागपूर) : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेवर विश्‍वास ठेवावा तरी कसा, असा सवाल करीत कोंढाळी बसस्थानकावर पालक व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. सायंकाळी साडेपाच वाजतापासून विद्यार्थी तब्बल आठ वाजेपर्यंत स्थानकावर बसची वाट पाहत होते. विद्यार्थी घरी न आल्याने पालक कोंढाळीत आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
काटोल आगाराच्या अखत्यारित येणाऱ्या कोंढाळी स्थानकावर गैरसोय होत असल्याचे वृत्त सकाळने बुधवारी प्रकाशित केले होते. त्याची प्रचिती गुरुवारी आली. आठवी ते बारावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थिनी व विद्यार्थी तब्बल दोन ते अडीच तास बसची वाट पाहत कोंढाळी स्थानकावर उभे होते. येणाऱ्या प्रत्येक बसकडे ही आपलीच बस या नजरेने ते पाहत होते. कोंढाळी येथे बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी सकुशल घरी पोहोचले नसल्याने विशेषत: विद्यार्थिनींचे फोन वारंवार वाजत होते. तर मुलांशी संवाद न झाल्याने अनेक चिंताग्रस्त पालकांनी कोंढाळी ठाण्यातही फोन केले. ठाणेदार श्‍याम गव्हाणे यांनी बसस्थानक परिसर गाठल्यावर त्यांच्याही लक्षात पालकांची चिंता आली.
काही पालक बसस्थानकावर आल्यावर अनेकांनी काटोल आगार व्यवस्थापकांना फोन लावला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. नागपूरच्या एसटी कार्यालयातही केवळ फोनची बेलच वाजत होती. यानंतर काटोलचे वाहतूक नियंत्रक तामगाडगे यांनी दखल घेत यंत्रणेला फोन केला. काटोल आगाराची बस पाठविण्याचा निर्णय घेतला. इतक्‍यात नागपूर येथून साधारण बस आली. विद्यार्थ्यांची धावाधाव झाली. कोंढाळीचे दुर्गाप्रसाद पांडे, शाळेचे शिक्षक, तरुण मंडळी यांनी बसस्थानक गाठून एसटी बसेसच्या अनियमित फेऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणेदार श्‍याम गव्हाणे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शांततापूर्वक परिस्थिती हाताळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT