Corona.jpg 
विदर्भ

Lockdown : प्रसिद्धीसाठी हपापलेल्या स्वयंघोषितांचा असाही आव...आवश्यक वाचा

सकाळ वृत्तसेवा

जानेफळ (जि.बुलडाणा) : आज-काल प्रसिद्धीसाठी हपापलेले स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते कुठल्या आणि कशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रसिद्धीसाठी प्रयत्न करतील याचा भरोसाच राहिलेला नाही. सध्या कोरोनाच्या ओढवलेल्या भीषण संकटात अनेक मदतीचे हात पुढे येत असताना काही सामाजिक कार्यकर्ते मात्र त्याचे फोटोसेशन करीत मीच करून घेतल्याचा आव आणत प्रसिद्धीचा खटाटोप करी असल्याने जानेफळ येथे सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रशासनाला सहकार्य करीत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी काही सामाजिक कार्यकर्ते मात्र सहकार्य कमी आणि फोटोशेषनच मोठ्या प्रमाणात करून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत चमकोगीरी करीत असल्याने त्यांच्या या कार्याची मोठ्या विनोदाने चर्चा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वच काम धंदे बंद असल्याने रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने अशावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे करीत गरजू कुटुंबांना आधार व दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

परंतु चमकोगिरी करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना यातही प्रसिद्धीची हाव राहावल्या गेली नसल्याने त्यांनी फोटोशेषनची दुकानदारी चालविली आहे. आज कोरोना संसर्गाच्या आजारांमुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असे असताना प्रशासनाच्यावतीने तसेच काही दाते यांच्यावतीने त्यांना मदतीचा हात देण्यात येत आहे पण अशी मदत देताना सुद्धा काही सामाजिक कार्यकर्ते स्वतःची पोळी शेकून घेताना दिसत आहेत. 

त्यामुळे गरज असलेला नागरिक हा आज परिस्थितीने लाचार आहे पण तो भिकारी नाही त्यांच्या अशा फोटोसेशन मुळे त्यांचा मानसन्मान मात्र दुखावल्या जात आहे. तेव्हा जर मदत द्यायची असेल तर त्यांना कोणतेही फोटोसेशन न करता मदत द्यावी तरच ती मदत खर्‍या अर्थाने त्या गरजावंता पर्यंत पोहोचेल व त्यामुळे  त्या गरजावंतांचा आत्मसन्मान हा अबाधित राहील. व त्यांना खरी मदत मिळेल. तेव्हा अशा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना रोखण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT