Suicide of a young woman over a love affair 
विदर्भ

प्रेमप्रकरणातून युवतीची आत्महत्या; प्रियकराने लग्नास नकार दिल्याने उचलला टोकाचा पाऊल

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : प्रेमप्रकरणानंतर युवतीने लग्न करण्याची मागणी केली. मात्र, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने युवतीने (वय ३२) गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गाडगेनगर हद्दीत एका परिसरात शनिवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पीडित मैत्रिणीकडे भाड्याने राहत होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संशयित आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला आहे. पवन मुकुंद खंडारे (वय २६, रा. राजमातानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पीडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली आहे. घटनास्थळावरून प्रियकराच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. प्रेमप्रकरणादरम्यान तिचे लैंगिक शोषण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले, असे पोलिसांनी सांगितले. गाडगेनगर ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध अत्याचार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे. पुढील तपास सुरू आहे. 
- आसाराम चोरमले,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गाडगेनगर

युवकाची गळफास लावून आत्महत्या

लहानपणापासूनच आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या तीन भावांचा अतिशय मेहनतीने जीवन प्रवास चालला असतानाच मोठ्या भावाने गळफास लावून आत्महत्या केल्याने पुसद येथील चंदन परिवारावर मोठे संकट कोसळले. आंबेडकर वॉर्डातील मच्छी मार्केटच्या बाजूच्या परिसरातील राम नकवाल चंदन (वय २४) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती कळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मेहेत्रे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

अपघातात युवकाचा मृत्यू

समोर असलेले गतिरोधक न दिसल्यामुळे ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागून येणारी दुचाकी ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात होळीसाठी धारणी येथे जात असलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विजय किसनसिंग चव्हाण (रा. धारणी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक जावेद खान गुलाब खान (रा. वलगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Gautam Gambhir: 'लोकांनी आमच्या क्षेत्रात नाक खुपसू नये, आम्ही...', वनडे मालिका जिंकल्यानंतर IPL मालकावर भडकला गंभीर

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT