खापरखेडा : ठाणेदार चंद्रकांत मदने यांना निवेदन देताना प्रमिला बागडे यांच्यासह परिसरातील सरपंच, बाजूला सुनील केदार.
खापरखेडा : ठाणेदार चंद्रकांत मदने यांना निवेदन देताना प्रमिला बागडे यांच्यासह परिसरातील सरपंच, बाजूला सुनील केदार.  
विदर्भ

सुनील केदार म्हणाले, अपमान करणाऱ्यांना अटक करा

सकाळ वृत्तसेवा

खापरखेडा (जि. नागपूर) : सिल्लेवाडा सरपंचाला उद्देशून करण्यात आलेल्या अश्‍लील वक्तव्य हे सरपंचाचा अपमान करणारे आहे. तक्रारीनंतर ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र, अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. यामुळे आरोपींना आठ दिवसांत अटक करावी अशी मागणी सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी केली.
शहर बससेवेच्या उद्‌घाटनावरून कॉंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत वाद निर्माण झाला होता. यानंतर भाजपने निषेध रॅली काढून आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या सभेत तंबाखे यांनी सिल्लेवाडाच्या सरपंचांना उद्देशून अश्‍लील वक्तव्य केल्याने हा वाद आणखीच चिघळला. सिल्लेवाडा सरपंच प्रमिला बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर ऍट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीला अटक करावी अशी मागणी करीत आज मंगळवारी खापरखेडा येथे निषेध सभा घेण्यात आली. या सभेत केदार यांनी ही मागणी केली. केदार म्हणाले, कोणत्याही महिलेचा अपमान सहन करणार नाही. तर महिला सरपंचांविरुद्ध केलेले वक्तव्य निंदनीय आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्याय देण्याची भूमिका घ्यावी.
सभेनंतर खापरखेडाचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांना सिल्लेवाडा सरपंच बागडे यांनी आमदारांसह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.यावेळी उपसरपंच मधू दुगाणे, भानेगावचे सरपंच रवींद्र चिखले, खापरखेडाचेसरपंच पुरुषोत्तम चांदेकर, उपसरपंच अर्चना ठवरे, पं.स.चे माजी उपसभापती आशीष उपासे, वलनीचे सरपंच लईक अन्सारी, पोटाच्या सरपंच वंदना ढगे, शांता कुंमरे, बसपच्या नेत्या बागडे, सविता भड, तापेश्वर वैद्य, दयाराम भोयर, बबन भड प्रामुख्याने उपस्थिती होते. निषेध सभेसाठी खापरखेडा, सिल्लेवाडासह परिसरातील नागरिकांसह संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून केदार यांच्या समर्थकांनी हजेरी लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT