वर्धा ः तिगावकर झुणका भाकर केंद्रात भोजनाचा आस्वाद घेताना खासदार सुप्रिया सुळे; सोबत आमदार डॉ. पंकज भोयर, सलिल देशमुख व इतर. 
विदर्भ

सुप्रिया सुळेंनी घेतला झुणका भाकरीचा आस्वाद 

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. 14) येथील प्रसिद्ध झुणका भाकर केंद्राला भेट देऊन तेथील आहाराचा आस्वाद घेतला. वर्ध्याला आल्या म्हणजे त्या झुणका भाकर केंद्रात आवर्जून जेवण करतात. यावेळीही कार्यक्रमानिमित्त आल्या असता त्यांनी येथेच भोजन करणे पसंत केले. या मेजवाणीने तृप्त होत त्यांनी तिगावकर दांपत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

आवडीच्या पदार्थांची तयारी सुरू

यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, किशोर माथनकर, सलिल देशमुख आदींची उपस्थिती होती. त्यांनीही सुप्रियाताईंसोबत सहभोजनाचा आनंद घेतला. वर्धा येथे आयोजित मुख्याध्यापकांच्या 59 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्‌घाटनासाठी आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीयांकडून झुणका भाकर केंद्राचे संचालक संजय तिगावकर यांना आपल्याकडे सुप्रियाताई जेवण करायला येणार असल्याचा निरोप देण्यात आला. निरोप मिळताच त्यांच्या आवडीच्या पदार्थांची तयारी सुरू करण्यात आली. 

 मुलीकरिता सहा पुरणपोळ्या पार्सल 

येथील मगन संग्रहालय चौकातील तिगावकर झुणका भाकर केंद्र लज्जतदार जेवणाकरिता सर्वदूर प्रसिद्ध आहे. सुप्रिया सुळे वर्ध्याला आल्या की त्या आवर्जून येथील झुणका भाकरीचा आनंद घेतात. अधिवेशनाचे उद्‌घाटन आटोपल्यानंतर सुप्रिया सुळे झुणका भाकर केंद्रात आल्या. त्यांनी झुणका भाकरसह पुरण पोळी, ठेचा, पाटवडी, आंबट बेसन आदींचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर मुलीकरिता सहा पुरणपोळ्या पार्सलही करून घेतल्या. येथील झुणका भाकर आणि पुरणपोळीला ब्रॅण्ड करायचा मानस आहे. बारामतीला असे केंद्र सुरू करायचे असल्यास आपण मदत कराल काय, अशी विचारणाही त्यांनी केली. यावर तिगावकर दांपत्याने ताई, केव्हाही सांगा आम्ही मदतीला तयार आहोत, अशी हमी दिली. 

सेल्फी काढून घेतली

या दरम्यान गप्पांचाही फड रंगला. आमदार डॉ. पंकज भोयर हे अनायासे तिथे उपस्थित असल्याने त्यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला. मुंबईला कितीदा येता, वर्ध्यात कसेकाय चाललेय, अशी चौकशी त्यांनी केली. चक्क सुप्रिया सुळे झुणका भाकर केंद्रात आल्याचे पाहून अनेक ग्राहकांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. जेवण करतानाच ग्राहकांची त्यांच्यासभोवताल गर्दी झाल्याने त्यांनी आपण आरामात फोटो काढू, जेवण करताना फोटो बरोबर निघणार नाही, असे नम्रपणे सांगितले. जेवण आटोपल्यावर सर्वांसोबत फोटो, सेल्फी काढून घेतली. एवढेच नव्हे तर झुणका भाकर केंद्राच्या कर्मचाऱ्यांसोबतही ग्रुप फोटो काढून घेतला.  

आस्थेने चौकशी 

झुणका भाकर केंद्रात जेवण करतानाच सुप्रिया सुळे यांनी बाजूलाच असलेल्या थालीपीठ विक्री केंद्रातून थालीपीठ मागविले. चर्चेत त्यांना थालीपीठ केंद्राचे संचालक अनिल भगत यांना अलीकडेच हृदयविकाराचा धक्का आल्याची व त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी काळजी व्यक्त करीत त्यांच्याविषयी आस्थेने चौकशी केली. आता प्रकृती बरी आहे ना, अशी विचारणाही केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT