file photo 
विदर्भ

तळीराम मास्तराची "मधू"शाला

सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी(चंद्रपूर): दोन शिक्षकी जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक सुटीवर गेले. दुसऱ्याकडे शाळेची जबाबदारी आली. त्याने शाळेत येतानाच दारू रिचवली. त्याला चांगलीच झिंग चढली. दारू उतरविण्यासाठी खेळाचे निमित्त केले. 27 विद्यार्थ्यांसह मैदानात उतरला. मात्र, अपेक्षप्रमाणे त्याचा तोल गेलाच. तळीराम मास्तराला सांभाळताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले. गावकऱ्यांपर्यंत गोष्ट गेली आणि शाळेला मधुशाला बनविणाऱ्या मास्तराला थेट ठाण्यात पोचविण्यात आले.

दारूबंदी फसवी

चंद्रपुरातील दारूबंदी किती फसवी आहे, याचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना यानिमित्ताने समोर आली. गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत भंगाराम तळोधीजवळच भंगारपेठ जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत 27 विद्यार्थी आहे. त्यांच्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी शाळेतील एक शिक्षक रजेवर होता. त्यामुळे एकाच शिक्षकावर शाळेची जबाबदारी आली. शाळा सुरू झाली. विद्यार्थीही शाळेत आले. पुस्तक वाचन करून विद्यार्थ्यांनी शाळेची सुरवात केली. 

दारू उतरविण्यासाठी नामी शक्कल

दुसरीकडे शिक्षकानेही मद्यप्राशन करून शाळेला मधुशाला बनविले. बरीच दारू ढोसल्यानंतर जरा जास्तच झाली याची जाणीव त्याला झाली. त्याला चांगलीच झिंग चढली. दारू उतरविण्यासाठी त्याने नामी शक्कल लढविली. शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सांगितले. तोही खेळात सहभागी झाला. पण झाले उलटच. दारूच्या अतिसेवनाने त्याचा तोल ढासळला आणि तिथेच तो लोटला. विद्यार्थीही घाबरले. खेळ सोडून ते मास्तराला सांभाळण्याच्या भानगडीत पडले. 

हेही वाचा — 'हनी देगा मनी'

शिक्षकाची रवानगी थेट ठाण्यात

इकडे गावात या प्रकाराची माहिती झाली. गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात फोन लावला. पोलिसांचे वाहन शाळेत आले. शाळा व्यवस्थापन समितीची चमूही घटनास्थळी दाखल झाली.मग काय त्या शिक्षकाची रवानगी थेट ठाण्यात झाली. वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी अद्यापही पोलिसांनी कारवाई केले नाही. चंद्रपूरच्या दारूबंदीला चार वर्ष पूर्ण झालीत. पण ती पुरतीच फसवी ठरली आहे. दारूऐवजी लहानलहान बालक ड्रगच्या आहारी जात आहेत. शाळेला मधुशाला बनविण्याच्या या शिक्षकाच्या प्रतापाबाबत आता प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT