विदर्भ

शिक्षकही देणार मदतीचा हात; कोविड रुग्णालयासाठी मदतनिधी उभारणार

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : मार्च महिन्यापासून शाळा बंद (School closed) आहेत. पर्यायाने शिक्षकसुद्धा लॉकडाउन झाले आहेत. या महामारीच्या काळात आपलेही देणे लागते, ही भावना सहज जेव्हा पुढे आली तेव्हा संघटनविरहित एकजूट निर्माण झाली. शिक्षकांच्या ‘फ्रेंड्‌स’ गटाद्वारे ‘चला जीवन वाचवू या’ (Let's save lives) ही संकल्पना पुढे आली. यामधूनच सामाजिक ऋण फेडण्याच्या उद्देशाने प्राथमिकसह माध्यमिक शिक्षकसुद्धा सरसावले. यामध्ये अधिकारीसुद्धा खारीचा वाटा उचलत आहेत. (Teacher Kovid will raise funds for the hospital Amravati news)

दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षकांनी एकजूट दाखवत तीन कोविड रुग्णालयांची निर्मिती केली. ही वार्ता सर्वत्र पसरली तेव्हा त्या जिल्ह्यातील शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. समाज माध्यमांवर ‘तेथील शिक्षक करू शकतात, मग येथील का नाही?’ हा मुद्दा काहींच्या काळजाला भिडला व यातून ‘चला जीवन वाचवू या’ ही संकल्पना पुढे आली.

यामध्ये जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या सहा हजार शिक्षकांना आवाहन करण्यात येत असून त्यांच्या सहकार्यातून मदतनिधी उभारला जाणार आहे. प्राथमिक शिक्षकांचे हे प्रेरणादायी कार्य समजल्यावर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापक संघाला ही बाब आवडली. त्यांनीसुद्धा तनमनधनासह प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्तांचा सहभाग

प्रथमच सर्वसामान्य शिक्षकांद्वारे आलेल्या सामाजिक कार्यासाठी अधिकाऱ्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही बाब जेव्हा सेवानिवृत्तांना समजली तेव्हा त्यांनीही यामध्ये खारीचा वाटा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मदतनिधीची ऐतिहासिक नोंद

प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह जिल्हापरिषद कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखविली तर निश्‍चितच ही रक्कम कोटींच्या वर जाणार आहे. यातून कोविड रुग्णालय निर्माण होणार की प्रशासनाला हा निधी सुपूर्द करणार, हे अद्याप निश्‍चित व्हायचे आहे. मात्र, कोरोनाच्या निमित्ताने होणाऱ्या या सत्कार्याची ऐतिहासिक नोंद होणार, हे मात्र निश्‍चित.

(Teacher Kovid will raise funds for the hospital Amravati news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT