teachers and headmaster spend money for books transportation in chandrapur 
विदर्भ

पाठ्यपुस्तकांचा प्रवास शिक्षण विभागाला अंगलट, पुस्तक वाहतुकीचा भार मुख्याध्यापकांवर

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. पाठ्यपुस्तक शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत निविदा काढल्या जातात. निविदा निघाल्यानंतरही शाळेपर्यंत पुस्तकेच पोहोचली नाही. केंद्रस्तरावरून मुख्याध्यापक, शिक्षकांनाच आणावी लागत आहे. त्यासाठीचा खर्चही त्यांनाच करावा लागतो. त्यामुळे हा खर्च देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत येत नसल्याच्या तक्रारही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे करण्यात आल्या. त्याची दखल घेत सहसंचालकाने माहिती मागिवली आहे. 

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. नगर परिषद, मनपा, जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांच्यामार्फतीने तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविली जातात. तेथून शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविण्याची जबाबदारी पंचायत समित्यांची असते. पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी निविदा काढल्या जातात. निविदेनुसार काम मिळालेल्या वाहतूकदाराला पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असते. मात्र, एक-दोन वर्षांपासून पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत न पोहोचविता ती केंद्रस्तरावर ठेवण्यात येतात. तेथून पाठ्यपुस्तके नेण्याचे कामे शिक्षक, मुख्याध्यापकांना करावे लागत आहे. यासाठीचा खर्चही त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी लागणारा खर्च देण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र, या मागणीची दखल घेण्यात आली नाही. 

पाठ्यपुस्तक आणण्यासाठी दरवर्षी खिशाला भुर्दंड बसत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत सहसंचालकाने समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन 2020-21 तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठ्यपुस्तके वाहतूक करण्यासाठी खर्च देण्यात आला. त्याअनुषंगाने पाठ्यपुस्तकांचा पुरवठा, तालुका ते शाळास्तर पाठ्यपुस्तके वाहतुकीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या माहितीने मोफत पाठ्यपुस्तके तालुका ते शाळेपर्यंत प्रशासनाने पोहोचविली की संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकाने ती अन्य ठिकाणाहून वाहतूक करून स्वखर्चाने आणली याची माहिती समोर येईल.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT