Tejas from amravati has interest in rapping  
विदर्भ

 'यो यो रॅप सॉंग' ;चांदूररेल्वेचा तेजस जपतोय शिक्षणासोबत रॅपिंगचा छंद

सकाळवृत्तसेवा, सायराबानो अहमद

चांदूररेल्वे (जि.अमरावती)  ः प्रत्येकाला आयुष्यात कुठला तरी छंद असतो आणि तो असायला ही हवा, असाच एक छंद जोपासत चांदूररेल्वे शहरातील तेजस इमले या युवकाला रॅप सॉंग तयार करण्याचा छंद लागला. त्याच छंदातून त्याला आपले करिअर बनवायचे असल्याचे तो सांगत आहे. आजपर्यंत त्याने सहा ते सात रॅप सॉंग बनवून ते यू- ट्यूबवर टाकले आहे. विशेष म्हणजे त्याचे यू-ट्यूबवरील सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत आहेत.

ना कुठला संगीत क्‍लास न घरात कोणी गायक, तरीही तेजस इमले याने यो यो हनी सिंग या गायकाला प्रेरित होत रॅप सॉंग स्वतःच लिहून ते शूट करण्याची कला अवगत केली आहे. पीपल्स कला मंच या सांस्कृतिक चळवळीत नाट्य व नृत्याचे धडे घेताना तेजस हा गायनाकडे आकर्षित झाल्याचे तो सांगतो. 

त्यात रॅप सॉंगने त्याला जास्तच आकर्षित केले. सहा वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर गीत लिहून तो त्याला म्यूझिक आणि त्याचे व्हिडिओ शूट करून गाणे तयार करतो. तसं पाहिलं तर त्याचा हा छंद जरा महागडाच आणि तेजसची घरची परिस्थिती मोजकीच. तेजस स्वतः बलून डेकोरेशनचे काम करतो, तर वडील नगरपरिषदेत सफाई कामगार. त्यामुळे कधी कधी वडिलांसोबत तोही झाडू मारायला जातो आणि मिळालेल्या पैशातून आपला छंद जोपासतो. 

एक गाणं बनवायला 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. पण कधीतरी आपलं एखादं गाण यू-ट्यूबवर हिट होईल आणि आपल्या करिअरची सुरुवात होईल, या अपेक्षेने आतापर्यंत विविध विषय घेऊन तेजस गीत लिहित आहे व कम्पोज करीत आहे. 

त्याच्या गीताचे विषयही सामाजिकच असल्याचे दिसून येते. त्याला त्याच्या या छंदात पीपल्स कला मंचचे नेहमीच सहकार्य मिळते. शिवाय गावातील अनेक मित्रमंडळी त्याच्या या कार्याला मदत करीत असल्याचे तेजसने सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT