testimony of 16 people including autopsy doctor in ankita pissude burn case hinganghat of wardha 
विदर्भ

अंकीता जळीतकांड : शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांसह १६ जणांची साक्ष, पुढील सुनावणी २० मार्चला

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्‌डे जळीतकांडात बुधवारी (ता. १७) दोन डॉक्‍टर, अंकिताच्या दोन विद्यार्थिनी आणि कबुली जबाबामधील एक पंच अशा पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी आता २० मार्च रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे आतापर्यंत एकूण १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहेत. 

नित्याप्रमाणे प्रकरणाचे कामकाज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या न्यायालयात सुरू झाले. प्रारंभी अंकिताचे शवविच्छेदन करणारे नागपूर शासकीय महाविद्यालयाचे डॉ. ऋषिकेश पाठक यांची साक्ष झाली. त्यानंतर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सौरभ धोपटे, दारोडा गावावरून मृतक अंकितासोबत येणारी विद्यार्थिनी व आरोपीने लपविलेले साहित्य ज्यांच्या उपस्थितीत जप्त केले ते पंच योगेंद्र जगनाळे यांची साक्ष झाली. 

सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे मांडत असून त्यांना सरकारी वकील दीपक वैद्य सहकार्य करीत आहे. बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने काम पाहत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT