विदर्भ

छायाचित्र नसलेल्या 38 हजारांवर मतदारांची नावे यादीतून वगळणार

सकाळ वृत्तसेवा

मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू झालेले आहे. मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या 38 हजारांवर आहे.

यवतमाळ : मतदारयादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील, अशा मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांची छायाचित्रे (Photos)नाहीत, अशांनी येत्या 25 जूनपूर्वी छायाचित्र अपडेट करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी केले आहे. (The names of 38 thousand voters who do not have photos in the electoral roll will be removed from the list)

मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू झालेले आहे. मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या 38 हजारांवर आहे. त्यात वणी विधानसभा मतदारसंघातील दोन हजार 697, राळेगाव विधानसभा मतदारसंघातील एक, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ 33 हजार 504, दिग्रस 262, आर्णी 178, पुसद एक हजार 555 व उमरखेड मतदारसंघातील 154 अशा एकूण 38 हजार 351 मतदारांनी छायाचित्र जमा केलेले नाहीत. मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्रे मिळवून ते यादीत अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदारयादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे.

याबाबत पंचनामे करून अशा मतदारांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वगळण्यात येणार आहेत. ज्या मतदारांची नावे वगळण्यात येतील, ते नव्याने नमुना 6द्वारे अर्ज करून पुन्हा आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करू शकतात. त्यामुळे ज्यांची छायाचित्र नाहीत, अशा मतदारांनी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर भेट देऊन फोटो अपडेट करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी केले आहे. (The names of 38 thousand voters who do not have photos in the electoral roll will be removed from the list)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT