विदर्भ

कीटकनाशक खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यासोबत घडला असा प्रसंग की सोडली होती आशा, मात्र...

तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील वनोजा देवी येथील शेतकरी पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशक औषध खरेदीसाठी वणी येथे एका कृषी केंद्रात आला. मात्र, चोरट्याने त्याचे पाकीट चोरून नऊ हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी तत्परता दाखवत तासाभरातच विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन पैसे मिळवून दिले.

आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच याही वर्षी दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे. कसेबसे पैसे जमवून शेतीत पेरणी केली असून, आता उत्पन्नाची प्रतीक्षा करीत आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत प्रत्येक ठिकाणी त्यांची फसवणूक केली जात आहे. बाजार हाटासाठी शहरात आल्यास चोरटे त्यांच्या पाळतीवर असतात. बसस्थानक परिसरातून अनेक शेतकऱ्यांना लुटल्याची उदाहरणे आहेत.

वनोजा येथील शेतकरी जनार्दन गाडगे (वय ७०) हे शेतातील फवारणीकरिता कीटकनाशक खरेदी करण्यासाठी शुक्रवारी वणी येथे आले होते. त्यांनी जटाशंकर चौकातील कृषी केंद्र गाठले. सध्या कृषी केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्याने आपला मोर्चा तिकडे वळविल्याचे दिसत आहे. चोरटा शेतकरी गाडगे यांचे पैशाचे पाकीट चोरून फरार झाला. काही वेळाने शेतकऱ्याला पैसे चोरी गेल्याचे लक्षात आल्याने त्याची भंबेरी उडाली.

आता फवारणीसाठी औषधी कसे घ्यायचे, याची काळजी त्याला पडली. शेतकऱ्याने वणी पोलिस ठाणे गाठले व ठाणेदार वैभव जाधव यांच्याकडे घडलेली हकिगत सांगितली. त्यानंतर ठाणेदार जाधव यांनी तातडीने डीबी पथकाला आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुनील खंडागडे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, गजानन भांडरकर, अमित पोयाम यांच्या पथकाने अवघ्या तासाभरात सेवानगर येथील अल्पवयीन मुलाकडून चोरीचे नऊ हजार रुपये जप्त करून शेतकऱ्याला परत केले. त्यानंतर पोलिस वाहनाने घाबरलेल्या शेतकऱ्याला त्याच्या गावी सोडून मानवतेचा परिचय करून दिला. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीवर शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले.

पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मिळाले पैसे
वणी येथील कृषी केंद्रात कीटकनाशक औषध घेण्यासाठी आलो होतो. मात्र, चोरट्याने माझे पाकीट मारले व त्यामधील नऊ हजार रुपये लंपास केले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली असता तासाभरात पैसे परत मिळवून दिले. पैसे परत मिळतील, याची आशा मी सोडली होती. मात्र, पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मला पैसे परत मिळाले.
- जनार्दन गाडगे,
शेतकरी, वनोजा

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

Jalna News : महापालिकेत भाजप-शिवसेनेचा राडा; महात्मा फुले मार्केट वरून जुंपली

Latest Marathi News Live Update : ७५ विद्यार्थी परदेशात अडचणीत, फंडस् नॉट रिसिव्हीड अधिकाऱ्यांची लाजिरवाणी कबुली!

IPL 2026 : ओहहहह भाई.. मोहम्मद शमीचा 'मॅजिक' डान्स पाहिलात का? SRH वर दणदणीत विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन Video Viral

पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

SCROLL FOR NEXT