Theft
Theft 
विदर्भ

परीक्षा भवनाच्या लॉकरमधून लाखोंची रोकड गायब!

सकाळवृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परीक्षा भवनातील लॉकरमधून लाखो रुपयांची रोकड लंपास झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून मौन पाळले जात असून, याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाच्या परीक्षा भवनात ऑनस्क्रीन मूल्यांकनासाठी विविध विषयांचे प्राध्यापक येतात. या प्राध्यापकांना प्रत्येक पेपरनुसार मानधन देण्यात येते. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने रविवारी (ता.३) दुपारच्या सुमारास प्राध्यापकांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. यावरून येथील लॉकर रूमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे प्रथम नकार दिला तर नंतर पैसे कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ही माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी आणि कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यापर्यंत पोहोचली.

त्यामुळे रविवारची सुटी असताना डॉ. खटी यांनी परीक्षा भवन गाठले. तपासात लॉकरमधील रोख रक्कमच लंपास केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात परीक्षा विभागातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे बोलले जाते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार पोलिसांत केली नसल्याचे समजते. दुसरीकडे याबद्दल परीक्षा नियंत्रक डॉ. खटी आणि डॉ. काणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कोट्यवधींची हेराफेरी
विद्यापीठाचा कारभार विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या भरोशावर चालतो. त्यामुळे लॉकरमधील पैसा विद्यार्थ्यांचा आहे. मात्र, असे असताना परीक्षा विभागातील इतक्‍या सुरक्षा व्यवस्थेतून लाखो रुपये लंपास केले जात असल्यामागे मोठा घोटाळा असण्याची दाट शक्‍यता आहे. त्यातूनच विद्यापीठाला आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुना लागला असावा, असा कयास लावला जात आहे. 

सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह  
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह परीक्षा विभागात कोट्यवधी रुपये खर्चून पोलिस विभागाची सुरक्षा यंत्रणा लावण्यात आली. मात्र, असे असताना लॉकरमधून पैसे कसे गायब झाले, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा फायदा काय? असाही प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

प्रकरणाबद्दल लिखित अद्याप काहीही विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे कारवाईबद्दल अद्याप विचार करता येणार नाही. मात्र, तसे काही आल्यावरच नियमानुसार कारवाई होईल. 
- डॉ. नीरज खटी, परीक्षा नियंत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT