There is no drinking water available at Chandrapur bus stand  
विदर्भ

काय सांगता! तब्बल १० कोटींच्या बसस्थानकात प्रवासी तहानलेलेच.. पण का? वाचा सविस्तर 

प्रमोद काकडे

मूल (जि. चंद्रपूर) : अत्याधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज येथील बसस्थानक एका वर्षात प्रवाशांच्या सेवेत सुपूर्द करायचे होते. मात्र अडीच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही बसस्थानकाचे काम अपूर्णच आहे. शासनाने प्रवासावरील बंदी उठविल्याने बसस्थानकात एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहे. 

परंतु 10 कोटींच्या बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता गृहाचा अभाव आहे. तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दहा कोटी रुपये शहर विकास आराखड्यांतर्गत या बसस्थानकासाठी मंजुर केले. एका दिमाखदार सोहळ्यात नवीन बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजन आटोपले. यावेळी मुनगंटीवार यांनी नवीन बसस्थानकाचे काम 12 महिन्यात पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी ते एसटी महामंङळाकडे सुपूर्द करण्यात येईल.. बांधकाम होणाऱ्या नवीन बसस्थानकात 24 तास वायफाय उपलब्ध राहील, असे त्यांनी सांगितले. 

आजच्या घडीला बसस्थानकाच्या कामाला अडीच वर्ष पूर्ण होत आहे. परंतु कंत्राटदाराने मुनगंटीवारांचा शब्द पूर्ण केला नाही. आधुनिक सोई-सुविधा झाल्याच नाही. उलटप्रवाशांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सोई सुविधा सुद्धा येथील बसस्थानकात नाही.

प्रवाशांसाठीच्या आवश्‍यक मूलभूत सोई सुविधा नसतील तर या दहा कोटींच्या पांढऱ्या हत्तीचा उपयोग काय? असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. बसस्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वी पालिकेने याठिकाणी सार्वजनिक वापरासाठी हातपंप लावला होता. त्याचा वापर कंत्राटदाराने बांधकामासाठी केला. आता तर त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. नवीन बनविलेल्या आधुनिक बसस्थानकात केवळ एक शौचालय आहे. प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी रांगेत उभे रहावे लागत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT