indian-railway.jpg 
विदर्भ

‘कोरोना’चा रेल्वेला ब्रेक...या महत्वाच्या गाड्या रद्द 

अनुप ताले

अकोला : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अकोला मार्गावरुन धावणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. काही दिवस प्रवास टाळण्याचे तसेच प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून, भारतातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढू नये तसेच प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारद्वारे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून राज्यात काही ठिकाणी जमावबंदी, कलम 144 लागू करण्यात आली आहे तर, राज्यभरात शासकीय, खासगी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. चीन मध्ये सुरुवात होऊन जगभरात कोरोनाचा प्रसार बाधित रुग्णांचा एकमेकांशी संपर्क आल्याने वाढत आहे. याबाबत खबरदारी म्हणून, बाहेर देशातून भारतात परतणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन, त्यांचेवर वैद्यकीय उपचार केला जात आहे. परंतु, इतर प्रवासातूनही प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे द्वारे दररोज लाखो लोक प्रवास करतात आणि ज्या शहरात बाधित रुग्णांची संख्या फुगत आहे, तेथून लोक त्यांच्या गावी परतण्यासाठी रेल्वेचा उपयोग करीत आहेत. मात्र अशा प्रवासातून कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या स्वरुपात होऊ शकतो म्हणून, खबरदारी घेत रेल्वे प्रशासनाने पुणे, नागपूर, भुसावळकडे अकोला मार्गे धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांच्या आठ फेऱ्या रद्द केल्या आहेत.

अकोला मार्गे धावणाऱ्या या गाड्या रद्द
गाडी                         नंबर                या कालावधी करीता रद्द
एलटीटी अजनी        11201               23 मार्च ते 30 मार्च
अजनी एलटीटी        11202               20 मार्च ते 27 मार्च
पुणे अजनी              22139               21 मार्च ते 28 मार्च
अजनी पुणे              22140               22 मार्च ते 29 मार्च
भुसावळ नागपूर       22111                18 मार्च ते 29 मार्च
नागपूर भुसावळ       22112                19 मार्च ते 30 मार्च
पुणे नागपूर             11417                26 मार्च ते 2 एप्रिल
नागपूर पुणे             11418                20 मार्च ते 27 मार्च

प्रादूर्भाव रोखण्यासाठी निर्णय
कोरोनाचा संसर्ग टाळ्यासाठी, प्रादूर्भाव रोखण्यासाठी अकोला मार्गे धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांच्या आठ फेऱ्या निर्धारित तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी.
- अरुण नांदूरकर, रेल्वे स्टेशन प्रबंधक, अकोला

प्लॅटफॉर्म टिकीट 50 रुपये
गर्दीतून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय रेल्वे स्थानकांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आतापर्यंत 10 रुपये किंमत असणारे प्लॅटफॉर्म टिकीट 50 रुपयांचे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT