Thousands of people gather at the funeral of Former MLA Anantrao Desarkar  
विदर्भ

लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप देण्यासाठी उसळली हजारोंची गर्दी; माजी आमदार अनंतराव देवसरकर अनंतात विलीन

अरविंद ओझलवार

उमरखेड (जि. यवतमाळ) : विधानसभेचे माजी आमदार, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. अनंतराव देवसरकर यांना शुक्रवारी (ता.27) मूळगावी चातारी येथे निरोप देण्यात आली. पुत्र राम व डॉ. भरत यांनी भडाग्नी दिला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाय इतरही अनेक संस्थांत विविध पदे त्यांनी भूषविली होती. उमरखेड विभागात 'वकील साहेब' म्हणून वेगळी ओळख होती. जनसामान्यांचे नेतृत्व मानले जात होते. त्यांनी उमरखेड विधानसभेचे दोन वेळा नेतृत्व केले होते. 

गुरुवारी (ता.26) औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयांत वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अखेरचा निरोप देण्यासाठी आमदार नामदेव ससाणे, माजी आमदार उत्तम इंगळे, राजेंद्र नजरधने, प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, आमदार वजाहत मिर्झा, आमदार माधव जवळगावकर, वसंत घुईखेडकर, मनीष पाटील, नाना गाड़बैले, किशोर भवरे, तातू देशमुख, पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैद, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, डॉ. विश्वनाथ विनकरे, प्रवीण देशमुख, डॉ. विजय माने, प्रशांत पत्तेवार, प्राचार्य एस. आर. वद्राबादे, प्राचार्य डॉ. चर्जन, माजी नगराध्यक्ष बालाजी उदावंत, राजू जयस्वाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर, शिक्षण सभापती श्रीधर मोहोड यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

मतभेद असताना मनभेद होऊ न देणारा नेता या शब्दांत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी संवेदना व्यक्त केल्या. माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी मनाची भाषा समजनारा नेता, तर आमदार ससाणे, माजी आमदार इंगळे यांनी लोकनेता, अशा शब्दांत संवेदना व्यक्त केल्या. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री मनोहर नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT