Three corona positive were found in Gadchiroli district 
विदर्भ

अखेर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातही पोहोचला कोरोना, तिघांचे नमुने आले पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : चिनमधून आलेला कोरोना विषाणू हळुहळू सर्वीकडे पसरायला लागला. याचा देशातही समावेश झाला. यामुळे मुंबई, पुणे, औरंगावाद, नाशिक, नागपूर चांगलेच प्रभावित झाले. येथे सर्वाधिक रुग्ण वाढत असताना विदर्भातील एकमेव जिल्हा गडचिरोली यापासून मुक्‍त होता. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, सोमवारचा दिवस गडचिरोलीसाठी काळा दिवस ठरला. एकाच वेळी जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित आढळून आले. विशेष म्हणजे... तिन्ही व्यक्‍ती जिल्ह्याबाहेरून आले आहेत. 

विदर्भात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वाधित रुग्ण नागपुरात आढळून आले आहेत. नागपुरात बाधितांचा आकडा पावशे चारशेच्या घरात जाऊन पोहोचला आहे. यानंतर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. वर्धा, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही कमी प्रमाणात रुग्ण आढळून आलेत. मात्र, आतापर्यंत गडचिरोली जिल्हा कोरोनापासून दूरच होता.

गडचिरोली जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तीन प्रवाशांचे कोरोना नमुने काल रात्री पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहेत. यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळ्या दोन क्वारंटाईन सेंटरचा व चामोशीमधील एका क्वारंटाईन सेंटरचा समावेश आहे. 

संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशील घेणे सुरू आहे. संबंधित पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते.

तिघेही जिल्हा बाहेरून आलेले

सोमवारी रात्री तिघांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कारण, आजवर गडचिरोली जिल्ह्यात एकही बाधित आढळून आला नव्हता. विदर्भात हाच जिल्हा कोरोनामुक्‍त होता. मात्र, तिघांना कोरोना झाल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना व बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT