Three people killed in a horrific accident at Shegaon in Buldhana  
विदर्भ

Accident News : शेगाव येथे पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! तीन ठार तर सात गंभीर जखमी

रोहित कणसे

शेगाव : पंढरपुर येथून देवदर्शन करून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे शेगावत देशमुख पेट्रोल पंपाजवळ वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पिल्लरवर धडकले. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू तर ७ गंभीर भाविक जखमी झाले आहेत. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याअसल्याने त्यांना अकोल्यात हलविण्यात आले.

पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी शेगावातील काही गेले होते. परतत असताना भाविकांच्या वाहनाला शेगावात मोठा अपघात घडला. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.

या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर ७ भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झल्याचेचे समजते.रात्री पासून हा प्रवास सुरु होता. आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त २ किलो मीटर अंतर बाकी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT