Tiger calves 
विदर्भ

वाघाचे तीन अशक्त बछडे आढळले; एकाचा मृत्यू, आईचा शोध सुरू 

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर ः खडसंगी वनपरिक्षेत्रात दोन दिवसांआधी गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाला वाघिणीचे तीन बछडे अशक्त स्थितीत आढळून आले. यातील एक बछडा अत्यंत अशक्त असल्याने उपचाराकरिता त्याला चंद्रपूर येथील ट्रांझिट उपचार केंद्रात आणत असतानाच त्याचा मृत्यू झाला. दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बछड्यांच्या आईचा शोध सुरू असल्याची माहिती खडसंगी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी के. व्ही. धानकुटे यांनी दिली. 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र खडसंगी नियतक्षेत्र तीन कक्ष क्रमांक ५३ परिसरात गस्तीवर असलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मंगळवारी, २७ ऑक्‍टोबर रोजी वाघिणीचे तीन बछडे अशक्त स्थितीत आढळून आले. तीन बछड्यांपैकी एक बछडा अत्यंत अशक्त होता. त्याला चंद्रपूर येथील ट्रांझिट उपचार केंद्रात आणत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानुसार बछड्याचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. अन्य दोन बछडे अशक्त असल्याने त्यांच्यावर चंद्रपुरातील ट्रांझिट उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. 

खडसंगी वनपरिक्षेत्राअंतर्गत क्षेत्रीय कर्मचारी आणि विशेष व्याघ्र संरक्षण दलामार्फत बछड्यांच्या आईचा शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई उपसंचालक (बफर), सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी के. व्ही. धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT