विदर्भ

धक्कादायक! तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर पडली 'त्याची' नजर आणि घडला थरार

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) ः तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने (Tiger Attack) हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना जानाळा येथील बफर झोन (BufferZone) क्षेत्रात मंगळवारी (ता. ४) सकाळी दहा वाजताच्यादरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला चंद्रपूर (Chandrapur) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वनिता वसंत गेडाम (वय २५) असे जखमी महिलेचे नाव आहे. (Tiger attacked on woman in chandrapur district)

तेंदूपाने तोडण्याच्या हंगामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. जानाळा येथील चार-पाच महिला तेंदूपाने तोडण्यासाठी जानाळा तलाव परिसरातील वाघलोधी या भागात सकाळी गेल्या होत्या. पाने तोडत असताना तलावाच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या एका वाघिणीच्या बछड्याने वनिता गेडाम यांच्यावर हल्ला चढविला. तिच्या सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्याने बछड्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.

वनिता गेडाम यांच्यापाठीवर, छातीवर तसेच हाताला गंभीर इजा झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आनंदराव कोसरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक उपचारासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात वनिता यांना दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

जानाळा तलाव आणि जानाळा परिसर बफर झोन क्षेत्रात येत असल्याने येथील घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार आहे. तलावाच्या परिसरात एका बछड्यासह या वाघिणीचे वास्तव्य असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही जानाळा गावाला वाघाच्या डरकाळीने दणाणून सोडले होते.

(Tiger attacked on woman in chandrapur district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : १२ वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Union Budget: फिस्कल डेफिसिट, राजकोषीय धोरण अन्... केंद्रीय अर्थसंकल्पातील कठीण आर्थिक शब्दांचे सोपे अर्थ बजेट आधीच समजून घ्या...

Chhatrapati Sambhajinagar Crime:‘मोस्ट वाँटेड’ ब्रोकर राजू जाधव जेरबंद; बनावट महिलांना उभे करून ७० लाखांचा जमीन गैरव्यवहार!

Epstein Files Controversy : एपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख? काँग्रेसच्या आरोपानंतर परराष्ट्र मंत्रालयाने अखेर दिलं स्पष्टीकरण...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प व्हेनेजुएलाचं तेल जगभरात विकण्यासाठी उतावीळ; म्हणाले - भारताचा खरेदीसाठी पुढाकार, चीनचंही स्वागत

SCROLL FOR NEXT