Man killed in tiger attack Man killed in tiger attack
विदर्भ

सायकलने घराकडे परत येत असलेल्या कामगाराला वाघाने केले ठार

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : चंद्रपूर महाआौष्णीक वीज केंद्राच्या परिसरात काही महिन्यांपासून वाघ (Tiger) व बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. दोन दिवसांपासून या भागात दिवसाढवळ्या वाघाचा वावर वाढला आहे. बुधवारी (ता. १६) रात्री १०.४५ वाजता कामावरून सायकलने घराकडे परत येत असलेल्या कामगाराला वाघाने उचलून नेत ठार केले. भोजराम मेश्राम असे मृत कामगाराचे नाव आहे. (Man killed in tiger attack)

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर महआौष्णीक वीज केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झुडुपी जंगल आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला हा भाग लागूनच आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे दर्शन या भागातील नागरिकांसाठी नवीन नाही. मात्र, काही वर्षांपासून या भागात वाघ (Tiger), बिबट, अस्वल यांनी ठाण मांडले आहे. दिवसाढवळ्या हे वन्यप्राणी नागरिकांना दर्शन देत आहेत.

भोजराम मेश्राम हे चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील कुणाल एंटरप्रायजेसमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सायकलने कामावर गेले. काम आटोपल्यावर ते गेट क्रमांक तेराने घराकडे येण्यास निघाले. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक वाघाने त्यांना उचलून नेत ठार (worker killed) केले. त्यांची सायकल या भागात पडून होती. हे काही कामगारांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती वीज केंद्र व्यवस्थापनाला आणि वनविभागाला दिली. वनविभागाने शोधमोहीम राबविली. त्यानंतर भोजराम मेश्राम यांचा मृतदेह आढळला.

तिसरी घटना

दोन दिवसांपासून या भागात वाघ फिरत आहे. वीज केंद्राने याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. काही महिन्यांपूर्वी वीज केंद्रातून पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेत ठार केले (worker killed) होते. त्यानंतर हिराई विश्रामगृहाजवळ वाघाच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT