विदर्भ

गोंदिया : वाघ आला, वाघ आला, पळापळा! गोरेगाव वनबिटात दहशत

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : गोरेगाव वनबिटात येणाऱ्या जानाटोलालगतच्या वनात वाघाचे बस्तान असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ‘वाघ आला रे, आला, पळापळा’ असा टाहो ऐकावयास येताच क्षणात शेतकरी, महिला कामे सोडून गावात येत आहेत. असे दृश्य मंगळवारी (ता. २७) वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभागाची चमू आणि गावकरी यांच्या जानाटोला या गावात झालेल्या गर्दीवरून निदर्शनास आले. (Tiger-News-Tiger-terror-in-Gondia-Fear-among-citizens-nad86)

भंडगा, कन्हारटोला, पिंडकेपार, रेल्वेटोली, जानाटोला, चंद्रपूरटोली येथील शेतकरी, शेतमजूर जीव मुठीत धरून शेतीचे कामे करीत आहेत. वनविभागाने नागरिकांच्या व वाघाच्या रक्षणासाठी प्रत्येक संशयास्पद ठिकाणी एक संपर्क पॉइंट तयार केला असून, एका चमूत तीन वनकर्मचारी तैनात केले आहेत. जानाटोला येथील श्यामा सोनटक्के यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. सहकारी व्यक्तींच्या मदतीने वाघाला पळवून लावल्याने त्यांचा जीव वाचला होता. मात्र, भंडगा येथील पूना मेश्राम यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

पूना मेश्राम यांचा बळी गेल्यानंतर वनविभागाच्या वतीने संपर्क प्वाइंट तयार करण्यात आला व जनजागृती करण्याचे काम सुरू झाले. असे असले तरी वनालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना भातपिकाची रोवणी करण्यासाठी जावे लागत आहे. या परिसरात वाघाचे बस्तान असल्याने वाघाची भीती आहे. एखाद्याने वाघ त्या भागात दिसला, अशी अफवा पसरवताच जिवाच्या भीतीने शेतकरी शेतीची कामे सोडून गावाकडे परत येत आहेत.

यापूर्वी वाघाने दोन्ही हल्ले जानाटोला, कन्हारटोला, बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गाच्या परिसरात केले आहेत. त्यामुळे वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण साठवणे यांनी वन गस्त चमू तयार केली आहे. ही चमू गस्त लावण्याचे काम करीत आहे. चंद्रपूरटोली, जानाटोला, कन्हारटोला, गराडा जंगल परिसरात संपर्क प्वाइंट तयार करण्यात आले आहेत.

वाघासंदर्भात सोशल मीडियावर आलेल्या बातमीवर विश्वास ठेवू नका. या अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच वनातील रस्त्यावरून शेतीच्या कामासाठी एकटे जाऊ नये. वाघासंदर्भात माहिती असल्यास तत्काळ वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क करावे.
- प्रवीण साठवणे, वनपरिक्षेत्राधिकारी, गोरेगाव

(Tiger-News-Tiger-terror-in-Gondia-Fear-among-citizens-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT