toor registration on portal still not starts in yavatmal 
विदर्भ

पोर्टलवर नोंदणी करण्याचा मुहूर्त निघेना, आता तूर खरेदीसाठी होणार वेगळ्या पद्धतीने नोंदणी

चेतन देशमुख

यवतमाळ : उडीद, सोयाबीननंतर सहकार विभागाने तूर नोंदणीसाठी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (ता. 28) डिसेंबरपासून पोर्टल अ‌ॅक्‍टिव्ह केले जाणार होते. मात्र, पोर्टल सुरू न झाल्याने यंदाचा हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे दोन दिवसानंतरही पोर्टलवर नोंदणी सुरू झाली नाही. शेतकऱ्यांची अडचण पाहता ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने तूर खरेदीसाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे. हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व दी विदर्भ सहकारी पणन महासंघाला पत्र दिलेले आहे. सोमवारी (ता. 28) पासून पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, अजूनही पोर्टल सुरू झालेले नाही. नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे झाले आहे. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळू नयेत, यासाठी शासनाने नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोर्टल तयार करण्यात आले असून शेतकऱ्यांना यावर नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, पोर्टल अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. सध्या तूर निघाली नसली तरी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. कापूस खरेदीसाठी यावेळी आधी नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कापूस घेण्यासाठी वेळ आणि ठिकाण देण्यात आले होते. तूर खरेदीतही याच पद्धतीने नोंदणी केली जात आहे. यंदा उडीद व सोयाबीनसाठी आधारभूत केंद्र सुरू करण्यात आलेली होते. मात्र, शेतकऱ्यांचा या केंद्रांवर प्रतिसाद कमीच होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

ऑफलाइन नोंदणीला सुरुवात -
जिल्ह्यात पोर्टल सुरू झालेले नाही. त्यामुळे नोंदणी कुठे करावी? असा प्रश्‍न शेतकऱ्यासमोर होता. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ऑफलाइन नोंदणी करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात केंद्रावर तुरीसाठी ऑफलाइन नोंदणी केली जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT