Torture of a married woman by threatening to kill a child Yavatmal crime news 
विदर्भ

मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार; कृषी केंद्र चालकाला अटक

सकाळ डिजिटल टीम

वणी (जि. यवतमाळ) : झरी तालुक्‍यातील बोपापूर येथील ३५ वर्षीय विवाहितेवर ‘तुझ्या मुलाला मारून टाकेल’ अशी धमकी देऊन अत्याचार केला. पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी कृषीकेंद्र चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता बोपापूर येथे आपल्या परिवारासह राहते. विवाहितेचा सात वर्षांचा मुलगा वणी येथील एका शाळेत शिक्षण घेत असल्याने त्याला महिलेने वणी येथे असलेल्या आईजवळ ठेवले होते. मुलाला भेटण्यासाठी ती वणी येथे येत होती. विराणी टॉकीज परिसरात असलेल्या कृषी केंद्राचा चालक संजय पिंपळकर (वय ३५) हा महिलेच्या पतीचा मित्र असल्याने त्याच्यासोबत महिलेची ओळख होती.

फेब्रुवारी २०२० मध्ये ती मुलाला भेटण्यासाठी वणी येथे आली असता संजय पिंपळकर याने तिला फोन केला व विवेकानंद शाळेजवळ भेटण्यास बोलावले. ‘जर तू आली नाही तर तुझ्या मुलाला मारून टाकीन’, अशी धमकी दिली. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी गेली. त्याने तिला दुचाकीवर बसवून वरोरा येथील एका हॉटेलमध्ये नेले व अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.

विवाहितेने ही घटना घरी तिच्या पतीला सांगितली व वणी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून वणी पोलिसांनी संजय पिंपळकर याला अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माया चाटसे करीत आहे.

शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून महागाव येथून जवळच असलेल्या कलगाव येथील शेतकऱ्याने शेतातील सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माधव चंपत नजरधने (वय ५३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माधव मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत जीवन जगत होते. दोन मुलींचे विवाह झाले, तर एका मुलीचा विवाह व्हायचा आहे. तीन मुलींसह पत्नी व मुलगा असा परिवार त्यांच्यामागे आहे. केवळ तीन एकर शेतीच्या उत्पादनावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank चा मालक बदलणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार?

Tukaram Mundhe Nana Patekar : तुकाराम मुंढे यांचे नाना पाटेकर यांच्यासोबतचे शेवटचे शब्द काय?, मुंढे झाले शोकसभेत भावूक ‘लव्ह यू बाळा...’

Cabinet Decision: शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा; छोट्या, चिंचोळ्या जमिनींबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय

Latest Marathi News Update : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

Dharashiv Crime News: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT