

Tukaram Mundhe Nana Patekar
esakal
Nana Patekar Last Words : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा देताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना बुधवारी मुंबईतील शोकसभेत अश्रू अनावर झाले. ‘लव्ह यू बाळा...’ हे नानांचे आपल्याशी बोलताना शेवटचे शब्द होते, असे सांगत मुंढे यांनी भावना व्यक्त केल्या. नाना आज शरीराने आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार आणि माणुसकीचा वारसा पुढे नेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.