tourist like pench tiger reserve for sighting in nagpur 
विदर्भ

पर्यटकांची पेंचकडे धाव, नेमक्या कोणत्या प्रवेशद्वारावरील पर्यटकांना होतेय वाघाचे दर्शन?

राजेश रामपूरकर

नागपूर : दिवाळीच्या दोन तीन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये थोडा निवांतपणा मिळावा म्हणून पर्यटक वन्यजीवन पर्यटनाला पसंती देऊ लागले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात सतत वाघांचे दर्शन होऊ लागल्याने दिवाळीच्या निमित्ताने ६० टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंग झालेले आहे. त्यात खुर्सापार आणि सिल्लारी प्रवेशद्वारावरील जंगल सफारीकडे पर्यटकांचा अधिक कल आहे. 

सिल्लारी आणि खुर्सापार गेटवरील पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे पर्यटकांकडून या गेटला अधिक पसंती मिळत आहे. मात्र, सालेघाट, चोरबाहूली, कोलितमारा, सुरेवानी या प्रवेशद्वाराला त्यातुलनेत अतिशय अल्प प्रतिसाद आहे. या परिसरात इतर वन्यप्राण्यांचे दर्शन हमखास होत असले तरी पर्यटकांचा वाघ पाहण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे अधिकतम पर्यटक या प्रवेशद्वाराकडे पाठ फिरवीत असल्याचे बोलले जात आहे. खुर्सापार आणि सिल्लारी या दोन प्रवेशद्वारावरील बुकिंग हाऊसफुल्ल झालेले असल्याचे दिसत आहे. 

बोर व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुरू झाले असून तेथील बोर आणि अडेगाव गेटला पर्यटकांची पसंती आहे. येथील बुकिंग फक्त ३० ते ४० टक्केच झालेले आहे. उमरेड- कऱ्हांडला-पवनी या अभयारण्यातील पवनी परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याने या प्रवेशद्वारावरील बुकिंग वाढलेले आहे. कऱ्हांडला प्रवेशद्वाराला मात्र, हवा तसा प्रतिसाद दिसत नसला तरी दिवाळीच्या सुट्टीत येथील पर्यटन वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्पात अद्यापही जिप्सीमध्ये सहा पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांना अधिकचा भुर्दण्ड द्यावा लागत असल्याने अनेकांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

याशिवाय विदर्भातील ताडोबा- अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर या अभयारण्याकडेही पर्यटकांची पावले वळू लागले आहेत. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण असलेला चिखलदऱ्यातील पर्यटनाकडे कल वाढू लागला आहे. थंडीचा कडाका वाढल्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी लांबच्या पल्ल्‍यापेक्षा जवळच्या पर्यटन स्थळाला पसंती दिली जात असल्याचे पर्यटन कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT