गुमगाव : रहदारीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालक.
गुमगाव : रहदारीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालक. 
विदर्भ

डांबरी मार्गावरील प्रवास धोकादायक

सकाळ वृत्तसेवा

गुमगाव (जि.नागपूर) : गुमगाव-हिंगणा मार्गावरून जाणाऱ्या अमरावती-जबलपूर आउटर रिंगरोडवर सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. रसरंजन आणि स्वागतम रेस्टॉरंट, सोंडेपार परिसर, शासकीय कॅन्सर रुग्णालय, गवसी-मानापूर आणि जामठा मार्गावर आणि रहदारीच्या पुलावर जागोजागी पडलेले खड्‌डे आणि ठिकठिकाणी फुटलेला रस्ता मार्गक्रमण करताना वाहनचालकांच्या हृदयाचा "ठोका' चुकवत आहे. खड्‌डे चुकविण्याच्या नादात कित्येक जडवाहने रस्त्याच्या बाजूला कित्येकदा पलटत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हे खड्‌डे दिसून न आल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते.
अमरावती-जबलपूर आउटर रिंगरोड सध्या चौफेर जीवघेणा ठरत आहे. या मार्गावरून जाणाऱ्यावाहनांमध्ये "ओव्हरटेक' करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. भरधाव वेगाने जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे कोतेवाडा आणि शासकीय कॅन्सर रुग्णालय परिसरातील पुलावर जीवघेणे खड्‌डे, जागोजागी पडलेल्या भेगा आणि परिसरातील डांबरी रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्‌डे पडलेले
आहेत. सुसाट वेगाने पळविणारे जडवाहनचालक बहुदा पादचारी आणि दुचाकी चालकांना मार्गच देत नाही. वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्यास अन्‌ खड्ड्यांमध्ये वाहन अडकल्यास अपघाताची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यातील जीवितहानी तसेच अपघाताची वाट न बघता प्रशासनाने
लवकरात लवकर या पुलावरील खड्‌डे, ठिकठिकाणी पडलेल्या भेगा आणि रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
सुरक्षा रोलिंगचे नुकसान
अमरावती-जबलपूर आउटर रिंगरोडवरील कोतेवाडा परिसरामध्ये असलेल्या पुलाच्या परिसरातील लोखंडी सुरक्षारोलिंगची वाहनांनी दिलेल्या धडकेने दुरवस्था झाली आहे. या मार्गावर प्रकाशाची
कोणतीही व्यवस्था नसल्याने रात्रीला किरकोळ अपघातात वाढ झाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT