tree plantation 
विदर्भ

इसको बोलते दिमाग! उन्हाळ्याच्या तोंडावर केली वृक्ष लागवड, आता घालत बसा पाणी

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कोणाचं डोकं कसं चालेल सांगता येत नाही. साधारणपणे सर्वसामान्य लोक पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वृक्षारोपण करतात. त्यातही एखाद्याने उन्हाळ्यात रोपटे लावले तर आपण त्याला मुर्खात काढतो. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात कोदोरी (मारुफ) येथे उन्हाळ्याच्या तोंडावर मजुरांकरवी वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीची पूर्वकल्पना ग्रामपंचायतला देण्यात न आल्याने हा नेमका काय प्रकार आहे, याबाबत ग्रामस्थांमध्ये शंकाकुशंका व्यक्त होत आहेत.

कोदोरी (मारुफ) येथील सर्वे नं. 34 मधील ई-क्‍लास जागेवर फेब्रुवारीमध्ये पोषक वातावरण नसताना शहापूर येथून मजूर आणून त्यांच्याकडून वृक्ष लागवड करून घेण्यात आली. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात रोपटे संवर्धनाची कोणतीही दक्षता या वृक्ष लागवडीत घेण्यात आलेली नाही. परिणामी लावलेले वृक्ष पूर्णतः वाळले आहेत. योजनेचा पैसा खर्ची दाखविण्यासाठी नावापुरते खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्यात आल्याची गावाकऱ्यांमध्ये खमंग चर्चा आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीची ही चेष्टा तर नाही ना?, असा प्रश्‍न गावकरी उपस्थित करीत आहेत.

कोदोरी येथील धक्कादायक प्रकार
नेमका हा प्रताप कोणत्या शासकीय विभागाने केला, त्याची अद्याप पुष्टी होऊ शकली नाही. मात्र माजी सरपंच गजेंद्र केने, उपसरपंच उद्धवराव गवई, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला देशभ्रतार, रोजगारसेवक बालिका गावंडे, पोलिस पाटील कोकिळा गेडाम, ग्रामस्थ अजय पाटील केने, तुळशीदास देशभ्रतार, सुभाष निंभोरकर, ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रय केने, ग्रामसेवक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत या वृक्ष लागवडीचा पंचनामा करण्यात आला.

लागवड करण्यात आलेले सर्व वृक्ष वाळलेले होते. त्यापैकी एकही जिवंत नव्हते. गावकरी एकीकडे रोजगाराची मागणी करीत असताना दुसरीकडे मात्र बाहेरगावाहून मजूर आणून शासकीय जमिनीवर निरर्थक वृक्ष लागवड केली जाते, त्याची पूर्वसूचना ग्रामपंचायतला दिली जात नाही, असे सांगत वृक्ष लागवडीची चौकशी करावी आणि संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच गजेंद्र केने यांनी विभागीय वनसंरक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT