विदर्भ

हिंगणा मार्गावर ट्रायल रन

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर कुतूहलाने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता लवकरच हिंगणा मार्गाने प्रवास करीत अंबाझरी तलावाचे सौंदर्य बघण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी महामेट्रोने हिंगणा मार्गावर मेट्रोची ट्रायल रन घेतली अन्‌ आणखी एक मैलाचा दगड पार केला. ट्रायल रनदरम्यान या परिसरातील नागरिकांनी धावती मेट्रो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.
हिंगणा मार्गावरील सुभाषनगर ते सीताबर्डीपर्यंतची मेट्रोची ट्रायल रन काल, गुरुवारी सकाळी घेण्यात आली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रायल रन दरम्यान चाचणी घेतली. मेट्रोची पहिली ट्रायल रन या भागातील नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली. या मार्गावर मोठ्या इमारतीतील नागरिक, मुले, महिलांनी धावत्या मेट्रोचे फोटो घेण्यासाठी फ्लॅटच्या गॅलरीत तर काहींनी इमारतींच्या छतावर गर्दी केली. वर्धा मार्गावर खापरी ते सीताबर्डी मेट्रो ट्रेन सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांत हिंगणा मार्गावर ट्रायल रन घेत महामेट्रोने कामाच्या प्रगतीचा वेगही अधोरेखित केला. मेट्रोमधून अंबाझरी तलावाचे सौंदर्य आणखी खुलून आले. ट्रायलदरम्यान प्रवास करीत असलेल्या अधिकाऱ्यांनाही अंबाझरी तलावाचे दृश्‍य टिपण्याचा मोह आवरला नाही. उत्तर अंबाझरी मार्गावर ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी तसेच हिल टॉप, एलएडी कॉलेज चौक, धरमपेठ, शंकरनगर चौक परिसरातील रहिवाशांनी घराच्या गॅलरी व छतावरून मेट्रो ट्रेनच्या ट्रायल रनचे चित्र आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त सिव्हिल लाइन येथील मुख्य कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

नागपूरकरांना सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे प्रमुख जवाबदारी आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या अतुलनीय कामगिरीसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे.
- डॉ. ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT