crime story.jpg 
विदर्भ

अरे बापरे! अंडे द्या नाहीतर कोंबडा द्या म्हणत, उचलले दगड, लोखंडी रॉड व कुऱ्हाड; मग सुरू झाले...

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : क्षुल्लक वादातून दोन गटात लोखंडी रॉड, कुऱ्हाड व दगडाने हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी गोशिंग येथे घडली. यात दोन्ही गटातील सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, नांदुरा तालुक्‍यातील गोशिंग येथील लखन मगन शेगर (30) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी गावातील गल्लीत गप्पा करीत उभा असताना गावातीलच प्रभाकर लक्ष्मण सावंत याने त्यांच्या पायाला दुचाकीचा धक्का मारला. या कारणावरून वाद होऊन प्रभाकर लक्ष्मण सावंत, विलास लक्ष्मण सावंत, सुमनबाई प्रभाकर सावंत, जयवंताबाई लक्ष्मण सावंत या चौघांनी फिर्यादी लखन मगन शेगर, भाऊ राम मगन शेगर, बहीण रेखाबाई सुखलाल बाबर या तिघांना रस्त्यावरील दगडांनी मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या गटातील सुमन प्रभाकर सावंत (वय 35) यांनी तक्रार दिली की, फिर्यादी घरी असताना गावातीलच लखन शेगर व सौदागर शिंदे हे हातात लोखंडी रॉड व कुऱ्हाड घेऊन घरासमोर आले. आम्हाला अंडे द्या नाहीतर कोंबडा द्या, अशी मागणी केली. त्यांना अंडे व कोंबडा आमच्याकडे नाही, असे सांगितले असता, दोघांनी वाद केला. 

या वादातून आरोपी लखन शेगर, सौदागर शिंदे, राम शेगर, शाम शेगर, आकाश शिंदे, गोच्या शिंदे, काळ्या शिंदे, प्रकाश शिंदे, रेखाबाई बाबर, धनाबाई बाबर यांनी संगनमत करून फिर्यादी सुमन प्रभाकर सावंत, पती प्रभाकर सावंत, दीर विलास सावंत, मुलगा गोविंदा सावंत यांना कुऱ्हाड, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त 10 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

जखमी उपचारासाठी बुलडाण्यात
दोन्ही गटातील जखमींना बुलडाणा येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यामुळे एका गटाने मंगळवारी तर दुसऱ्या गटाने बुधवारी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं मिलिंद सोनुने करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 2600 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स फायद्यात?

IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११

Bhondu Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणातील सोशल मीडियावरील 4500 लिंक नष्ट

'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेची वेळ बदलली, १३ एप्रिलपासून दोन मालिकेच्या वेळेत मोठा बदल, दुसरी कोणती मालिका?

Latest Marathi News Live Update: वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 17.5 लाखांची फसवणूक; एक आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT