Blood Donation 
विदर्भ

हीच तर खरी देशसेवा! संकट काळात दुसऱ्यांच्या जीवासाठी त्यांनी केले रक्तदान 

सकाळ वृत्तसेवा

अहेरी (जि. गडचिरोली) : कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे पूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात रक्त कमी पडू नये म्हणून भारतीय जनता पक्ष तालुका अहेरीच्या वतीने लॉकडाउनचे सर्व नियम पाळत शनिवारी (ता. 9) रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना पण रक्त मिळत नाही. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाच तालुक्‍यांतून रुग्ण येतात. त्यामुळे कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयात रक्ताची कमतरता भासू नये यासाठी भाजप तालुका अहेरीच्या वतीने आमदार रामदास आंबटकर तथा भाजप प्रदेश सरचिटणीस व खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात इंडियन पॅलेस हॉल या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 52 लोकांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, जिल्हा सचिव संदीप कोरेत, विक्की तोडसाम, नगरपंचायत सभापती नारायण सिडाम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, दिलीप पडगेलवर, राकेश गुडेल्लीवार, नागेश रेड्डी, अभिजीत शेंडे, अमोल गुडेल्लीवर, दिनेश येणगंटी, उमेश गुप्ता, साईनाथ औटकर व ब्लडबॅंक टीम यांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT