tuberculosis and leprosy patients found in yavatmal 
विदर्भ

यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण; क्षयरोग्यांना उपचारासाठी दरमहा ५०० रुपये

सूरज पाटील

यवतमाळ : जिल्ह्यात सध्या एकूण 1 हजार 480 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना निश्‍चय पोषण योजनेअंतर्गत दरमहा 500 रुपये याप्रमाणे औषधोपचारासाठी लाभ देण्यात येत आहे. एक एप्रिल ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात 158 कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे.

कोरोना महामारीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे राज्य शासनाने संयुक्तरीत्या रुग्ण शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबर कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे लवकरात लवकर निदान करून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार रोखणे, समाजामध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. गृहभेटीसाठी येणाऱ्या पथकातील सदस्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या मोहिमेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्रशांत पवार आदी सहकार्य करीत आहेत.

अडीच हजार पथकांद्वारे भेट -
जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यासाठी ग्रामीण भागातील 22 लाख 69 हजार 859 व शहरी भागातील दोन लाख एक हजार 67 लोकसंख्येचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत केले जाणार आहेत. यासाठी ग्रामीण भागासाठी 2,395 व शहरी भागासाठी 154 पथके नेमण्यात आलेली आहेत. गृहभेटीमध्ये कुटुंबातील महिला सदस्यांची तपासणी आशा स्वयंसेविका, तर पुरुष सदस्यांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT