Tukaram Mundhe shared a video of the government hospital Gadchiroli Goverment hospital news 
विदर्भ

विश्वास बसत नाही! पंचतारांकित हॉटेल नव्हे तर शासकीय रुग्णालय; तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला हा व्हिडिओ एकदा पहा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सरकारी काम म्हटलं म्हणजे बारा महिने थांब असं म्हटलं जाते. यामुळेच लोकांना शासकीय कार्यालय कंटाळवाणे वाटतात. हीच स्थिती शासकीय रुग्णालयांची झाली आहे. रुग्ण बरा होईल तेव्हा होईल; पण, रुग्णालयाची स्थिती पाहून आपण बरेचं होणार नाही, असे मात्र रुग्णाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. मात्र, याला अपवाद असलेल रुग्णालय विदर्भात तयार करण्यात आले आहे. याचा व्हिडिओ तुकाराम मुंढे यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

सरकारी रुग्णालय म्हटले की घाणेरडे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. रुग्णालयाच्या आजुबाजूला कचऱ्याचा ढीग, रुग्णालयात कुठेही झोपलेले आणि उपचार घेत असलेले रुग्ण, घाणेरडा वास, डॉक्टर जागेवर नाही असेच काहीसे चित्र पहिल्या नजरेत पाहायला मिळते. रुग्णालयाची दूरवस्था आणि रुग्णांच्या नातेवाईकांना होणाऱ्या मनस्पातामुळे अनेकजण शासकीय रुग्णालयात जाणे टाळतात.

शासकीय रुग्णालयात उपचार मोफत किंवा कमी किंमतीत होतो. तसेत औषधही मिळतात. तरी रुग्ण शासकीय रुग्णालयात जाण्याऐवजी खासगी रुग्णालयाला अधिक प्राधान्य देतात. खासगी रुग्णालय पाहताच मन प्रसन्न होतो. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची सेवा चांगली असते. यामुळे घरच्यासारख वातावरण असल्याचे जाणवते. मात्र, या रुग्णालयात दाखल होण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.

मात्र, अशीच सुविधा, साफसफाई, चागंला परिसर शासकीय रुग्णालयात मिळालं तर तुम्ही कोणत्या रुग्णालयात जाऊ असाच काहीसा विचार कराल. किंवा अस कस शक्य आहे असच काही म्हणाल. मात्र, हे अशक्य वाटणार काम विदर्भातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील एका रुग्णालयाने करून दाखवल आहे.

नागपूरचे माजी आयुक्त तुकाराम मुढे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गडचिरोली जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ १.५३ मिनिटांचा असून एका पंचतारांकित रुग्णालयासारखा दिसतो. परंतु, हा व्हिडिओ हॉटेलचा नसून रुग्णालयचा यावर कोणीही विश्वास करणार नाही. व्हिडिओत दिसणाऱ्या रुग्णालयाची स्वच्छता, मल्टीस्पेशालिटी सुविधा आणि डेकोरेट हे भुरळ घालणारे आहे. खासगी रुग्णालयालाही मागे टाकेल, असा रुग्णालयाचा व्हिडिओ आहे.

दीपक सिंगला यांनी केलेल्या कामाचा परिचय

गडचिरोलीतील हे सरकारी रुग्णालय राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी रोल मॉडेल बनू शकते. दीपक सिंगला यांनी केलेल्या कामाचा हा परिचय आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्याप्रकारे शाळांचा कायापालट केला त्याच प्रमाणे दीपक सिंगला यांनी रुग्णालयाचे रूप बदलले. सरकारी रुग्णालय कसे असावे, हे दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. या कामासाठी गडचिरोलीच्या टीमचे तुकाराम मुंढे यांनी अभिनंदन केले आहे.

मुंढेंचे विदर्भावरील प्रेम कायम

नागपूर मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांचे विदर्भावरील प्रेम काही कमी झालेले नाही. ते नागपुरात असताना अनेक कठोर निर्णय घेतले. यामुळे त्यांचा विरोध झाला. राजकीय नेत्यांशी वादही झाला. मात्र, त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत काही बदल केला नाही. यामुळेच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, त्यांचे विदर्भावरील प्रेम काही कमी झाल्याचे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT