two accused arrested in dharani mass physical abused case
two accused arrested in dharani mass physical abused case 
विदर्भ

धारणी सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना अटक

कृष्णा लोखंडे

धारणी : टेंबली येथील बलात्कार प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजपने पोलीस ठाण्यावर धडक देत कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, धारणी पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बसची वाट पाहत असलेल्या एका महिलेला दोन तरुणांनी थोड्या अंतरावरच बस उभी आहे, असे सांगून तिला आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि धारणी येथून टेंबली गावाजवळच्या एका शेतात नेले. तेथे त्यांनी या महिलेला मारहाण करून तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणात आरोपी पोलिसांच्या हाती लागले. मात्र, राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सामूहिक बलात्कार असताना सामूहिक बलात्काराच गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ऍट्रॉसिटी ऍक्‍ट लावण्यात आलेला नव्हता. आज भाजपने या प्रकरणात तत्काळ पावले उचलण्याचा अल्टिमेटम पोलिसांना दिला. दोन दिवसांत पीडितेला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या सर्वांनी पोलिस ठाण्यावर धडक देत कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. 

एका महिलेवर अत्याचार झाला असून स्थानिक पोलिस व सरकार हे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी सामूहिक व अ‌ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविला नाही. यासाठी स्थानिक पोलिसांची तक्रार वरिष्ठांपर्यंत करणार असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Lok Sabha Poll : शिवसेनेकडून सात नवे चेहरे रिंगणात; एकनाथ शिंदे यांची रणनीती; चार खासदारांचे तिकीट कापले

Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Lok Sabha Poll 2024 : जाळलेल्या ईव्हीएममधील ४१० मते सुरक्षित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

SCROLL FOR NEXT