आगरगाव : घटनास्थळी जमलेली नागरिकांची गर्दी. 
विदर्भ

थर्टी फर्स्टच्या रात्री सुरू होती झिंगाट पार्टी अन्‌ शेतात घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

आगरगाव (जि. वर्धा) : सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी तरुणाई बेभान होऊन झिंगाट रंगली. थर्टीफस्टची पार्टी सुरू असताना दोन मित्रांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला.

आगरगाव-लोणी मार्गावरील बालू ऊर्फ सुरेंद्र अंदूरकर यांच्या शेतात मंगळवारी (ता. 31) रात्री ही घटना घडली. गौतम चिंधू फुलझेले (वय 48) आणि किरण तुळशीराम देशमुख (वय 48, रा. आगरगाव), अशी मृतांची नावे आहेत. 

शेतात पार्टी झाली जीवघेणी 

आगरगाव येथील मयूर सुरेशराव देवघरे यांनी बालू ऊर्फ सुरेंद्र अंदूरकर यांचे शेत ठेक्‍याने केले आहे. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी मयूर देवघरे, गौतम फुलझेले, दामू नेहारे, किरण देशमुख यांनी शेतात पार्टी करण्याचा आधीच बेत आखला होता. ठरल्याप्रमाणे रात्री चौघेही सर्व साहित्य घेऊन शेतात गेले. शेतातील विहिरीलगतच या चार मित्रांनी छोटेखानी पार्टी सुरू केली. 


सोबतचे मित्र घाबरले 

दरम्यान, गौतम फुलझेले आणि किरण देशमुख यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. सोबतचे मित्र विहिरीत पडल्याने दामू नेहारे व मयूर देवघरे घाबरले. त्यांनी थेट गावात येऊन ग्रामस्थांना व पुलगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, चंदू खोंड, बलदेव भुते आणि पोलिस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. 


मृतदेह बाहेर काढले 

यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

Why Eyes Twitch: डोळा सारखा फडकतोय ? समजू नका सामान्य; शरीरात असू शकते या घटकाची कमतरता!

मराठी अभिनेत्रीसोबत केलेलं लग्न पण घटस्फोटाने पूर्ण खचले, यतीन कार्येकर यांनी पहिल्यांदाच बोलले; मी कामात होतो तेव्हा ती...

Ambad car theft case : अंबड तालुक्यातील कार चोरीचा अवघ्या सहा तासांत उलगडा; दोन चोरटे जेरबंद, शस्त्रांसह स्विफ्ट डिझायर कार जप्त

SCROLL FOR NEXT