two wheelers thieves gang are active in Amravati
two wheelers thieves gang are active in Amravati  
विदर्भ

अमरावतीत दुचाकी चोरांचा धुमाकूळ सुरूच; शहरात तयार होताहेत नवनवीन टोळ्या  

संतोष ताकपिरे

अमरावती:  ग्रामिण पोलिसांनी शहरातील अठरा दुचाकी जप्त केल्या असतानाही दुचाकीचोरीची श्रुंखला अद्याप थांबलेली नाही. पुन्हा पाच दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले.

राजापेठ हद्दीतील व्यापारी संकुलासमोर राहणाऱ्या अक्षय गजानन वडतकर (वय 27) या युवकाची एमएच 28 एक्‍स 4488 क्रमांकाची 18 हजार रुपयांची दुचाकी घराच्या आवारातुन चोरीस गेली. वडतकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

रामपुरीकॅम्प येथील साईमंदिराजवळ विक्की प्रकाशमल नावानी (वय 27) युवकाने एमएच 27 सीक्‍यु 2284 क्रमांकाची दुचाकी उभी केली. होती चोरीस गेली. नावानी यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बडनेरा हद्दीत दुर्गापूर येथील कुलकर्णी यांच्या वाडीत संदीप भाऊराव भवाळ (वय 28) यांची एमएच 27 यु 8115 क्रमांकाची दुचाकी उभी केली असता, ती रात्रीतून कुणीतरी चोरली. 

बडनेरा ठाण्यात भवाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. एमआयडीसी सावर्डी येथील औद्योगिक वसाहतीत रात्रपाळी ड्यूटी करणाऱ्या अंकुश निळकंठ पाटील (वय 22) या युवकाची एमएच 27 बीवाय 5380 क्रमांकाची दुचाकी कंपनीचे आवारातून चोरीस गेली. पाटील यांच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

खापर्डे बगीचा परिसरातून एका महिलेची एमएच 27 एजे 2442 क्रमांकाची दुचाकीही चोरीस गेली. महिलेच्या तक्रारीवरून कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुचाकीचोरीत नवनवीन टोळही असल्याचे दिसून येते. लॉकडाऊन काळानंतर अशा चोऱ्या मोठ्या संख्येने वाढल्या.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT