udhav thakare says Priority will be given for funding as well as land acquisition by reviewing the completion of irrigation projects
udhav thakare says Priority will be given for funding as well as land acquisition by reviewing the completion of irrigation projects 
विदर्भ

मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा : सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देणार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भंडारा जिल्ह्यतील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे काम गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी याचा दौरा केला. महाविकासआघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा विदर्भ दौरा होता.

यापूर्वी त्यांनी विदर्भात समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी दौरा केला होता. त्यानंतर आज ते पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यातील गोसेखुर्द धरणावर आले. विदर्भ हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आणि तेवढाच महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोसेखुर्द प्रकरणाचे काम ३५ वर्षांपासून सुरू आहे. पण, अद्यापही ते पूर्णत्वास गेले नाही, असा प्रश्न विचारला असता विदर्भातील रखडलेल्या सर्व प्रकल्प, सर्व कामांची पाहणी करणे, तिथल्या लोकांच्या अडचणी समजून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर पुढील काळात उपाययोजना करण्याचे काम करणार आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उमरेड विधानसभा मतदारसंघातील चाळीस गाव या प्रकल्पामध्ये गेलेली आहेत. पण, अद्यापही त्या गावातील पुनर्वसनाची कामे पूर्ण झालेली नाहीत. वीज पाणी आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा अद्याप तेथे पोहोचलेल्या नाहीत, असे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर ठाकरे यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले.

तिथे सविस्तर चर्चा करून प्रकल्प पूर्ण करणे आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी आमदार राजू पारवे यांच्यासोबत बोलताना दिले. मुख्यमंत्र्यांनी येथे धरणाच्या द्वारकेची पाहणी केली. त्यानंतर त्यांना क्रमांक दोनचे द्वार उघडून दाखवण्यात आले. दोन मिनिटांसाठी या जलाशयातून पाणी सोडण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT