tower 
विदर्भ

मोबाईल कंपन्यांना शेवटची संधी

मनोज भिवगडे

अकोला ः महापालिका क्षेत्रात परवानगी न घेता स्टरलाईट कंपनीसोबत केबल टाकणाऱ्या व टॉवर उभारणाऱ्या मोबाईल कंपन्यांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडे असलेले मॅप व इतर दस्तऐवज सादर करण्याची शेवटची संधी दिली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत सर्व कंपन्यांना ही दस्तऐवज सादर करावयाचे असून, त्यानंतर महापालिका अनियमिततेप्रकरणी पोलिस तक्रार करणार आहे.


मोबाईल कंपन्यांनी कोणतीही परवानगी न घेता परवानगी घेवून काम करणाऱ्या स्टरलाईट कंपनीसोबतच त्यांचेही केबल टाकले. हीबाब उघड झाल्यानंतर मनपा प्रशासनाने खोदकाम सुरू केले. त्यात मोठ्याप्रमाणावर अनियमितता झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे झोननिहाय सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले. त्यात 228 पैकी 220 टॉवर विनापरवानगी सुरू असल्याचे दिसून आले. यासंदर्भात मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी दुपारी आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यात आयुक्तांनी सायंकाळपर्यंत दस्तऐवज सादर करण्याची सूचना केली होती. सायंकाळपर्यंत कंपन्या दस्तऐवज सादर करू शकल्या नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला.


जिओचाच सर्वाधिक घोळ
रिलायन्स जिओने 4 जी केबल टाकताना सर्वाधिक घोळ केल्याचे दिसून आले. जिओने 120 चे मॅपिंग सादर करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात 130 किलोमीटर केबल टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही 94.5 किलोमीटर केबलचीच परवानगी घेतली आहे. याशिवाय 4.5 किलोमीटरचे काम कोणत्याही विभागाची परवानगी न घेताच करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा  : शाळांचा प्रायोगिकतत्त्वार विकास करणार
टॉवरमध्ये सर्वच कंपन्या अडचणीत
शहरातील 228 मोबाईल टॉवरपैकी 20 टक्केही टॉवरची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे टॉवर प्रकरणात सर्वच कंपन्या अडचणीत आल्या आहेत.

कोणत्या कंपनीचे किती टॉवर वैध, अवैध?
- जिओ कंपनीने शहरात 65 टॉवर बसविले आहेत. त्यापैकी 14 चीच परवानगी घेण्यात आली आहे.
- इतर मोबाईल कंपन्यांना सेवा देणाऱ्या इंडस कंपनीनेच 38 टॉवर आहेत. त्यात 14 चीच परवानगी आहे.
- व्होडाफोन, आयडीया, आणि मोबाईल कंपन्यांना सेवा देणाऱ्या एटीएस कंपनीच 72 पैकी 22 टॉवरच परवनगी घेवून सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT