unemployment.jpg
unemployment.jpg 
विदर्भ

अरे देवा! लॉकडाउनने आणली बेरोजगारी अन् आता आली ही वेळ...

सागर कुटे

अकोला : आधीच शासकीय जागा कमी निघतात, त्यात विविध प्रकारच्या गटांत जागा वाटप होत असल्याने त्या पदाकरिता आटोकाट प्रयत्न करूनही नंबर लागत नाही. परिणामी, आता करावे तरी काय? या प्रश्‍नाने अनेक तरुण निराशेच्या आहारी जात आहे. त्यात आता लॉकडाउनने आणखी भर टाकली आहे. 

राज्यात शिक्षण, करिअर, स्ट्रगल, नाती, पैसे या सगळ्या गोष्टीत आता बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाली आहे. पोस्टग्रॅज्युएशन पूर्ण करूनही व्यवस्थित नोकरी न लागलेला एक मोठा वर्ग स्ट्रगल करत आहे. शासकीय नोकरी मिळेल या आशेने हजारो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. दिवसभर क्लासेस, नंतर लायब्ररीत वाचन असा दिवस घालवित कुठेतरी नक्की नोकरी मिळेल अशी आशा बाळगत दिवसभराची घडी बसवित आहे. मात्र, यात अनेक जणांची वयाची घडी विस्कटत चालली आहे.

अशातच काही जण खासगी कंपन्याचे हात पकडून उदरनिर्वाह करत आहे नव्याने पसरत चाललेल्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये पडेल ते काम करून दिवस ढकलणो चालू आहे. मात्र, या लॉकडाउनने या खासगी कंपन्यात काम करणाऱ्या तरुणांपुढेही नवे आव्हान उभे केले आहे. कामावरून कमी करून त्यांना पुन्हा बेरोजगार केले आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीबांना दिवस भागविणेही कठीण झाले आहे. त्यात कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड आणखी बेदना वाढवून जात आहे. यातच हातावर पोट असलेल्या मजुरांना तर गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.

बेरोजगार तरुण सोशल मीडियावरच विचारतात ‘सल्ले’
लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेले काही तरुण आता या स्थितीत काय करावे? असे उपाय शोधण्यात व्यस्त आहेत. घरातून बाहेर निघता येत नसल्याने कोण आपल्याला योग्य सल्ला देईल या विचारात सोशल मीडियाच यांचा मित्र बनला आहे. सोशल मीडियावर लॉकडाउन काळात घरबसल्या आपण काय करू शकतो, यावर विविध फंडे उपलब्ध होत आहे. त्यातच अनेक तरुण हे सोशल मीडियावरील ग्रुपवर ‘लॉकडाउनमुळे माझी नोकरी गेली, आता घरुन काही करता येईल का?’ असे सल्ले विचारताना दिसून येत आहे.

लॉकडाउन तारतेय
लॉकडाउन तारतेय ही चर्चा चांगली जोरात सुरू आहे. लॉकडाउनमुळे मोठ्या कंपन्यांमध्ये प्रोडक्शन बंद आहे. त्यात माल कंपनीत पडून आहे. जिल्ह्याच्या सीमा सिल केल्या आहे. परिणामी, अनेक कंपन्या कामगारांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. मात्र, शासनाने कामगारांना न काढण्याचे केलेले आव्हान व आता कामावरून काढले तर हे कामगार करतील काय? या प्रश्‍नाने कुठेतरी कंपन्याही विचार करीत आहे. लॉकडाउन संपताच कामावरून कमी होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. म्हणून हे लॉकडाउन तारतेय असा समज सर्वांना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT