विदर्भ

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकाची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

नागपूर- नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवून दोन आरोपींनी एका बेरोजगार युवकाची 35 हजार रूपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

या आरोपींनी टोळी तयार केली असून आतापर्यंत शेकडो युवकांना नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याची माहिती समोर आली आहे. अमित तुळशिराम काटनकर (वय 30, मंगलदीपनगर, मानेवाडा बेसा रोड) आणि श्रीरंग चंद्रशेखर कोंगे (वय 32, रा. दर्शन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

कार्तिक महादेव कुत्तरमारे (वय 30, रा. इंदिरा नगर, टीबी वार्डमागे) हा उच्चशिक्षित असून बेरोजगार आहे. ते नोकरीच्या शोधात होता. सप्टेबर 2016 मध्ये त्याची ओळख श्रीरंग आणि अमितशी झाली. त्यांनी व्हीआयएसआयओएनडीईडी प्रा. लि. कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी 35 हजार रूपयांचा पहिला टप्पा खर्च सांगण्यात आला. नोकरी मिळत असल्यामुळे कार्तिकनेही लगेच 35 हजार रूपये आरोपींना दिले. तेव्हापासून दोघेही नोकरी लावून देण्याच्या नावाखाली उडवाउडवीची उत्तरे देत होती.

कार्तिकने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींनी वरील कंपनीचे बनावट नियुक्‍तीपत्र तयार केले. त्यावर बनावट सही-शिक्‍के वापरून नोकरीवर रूजू होण्यास सांगितले. मात्र, नियुक्‍तीपत्र घेऊन कंपनीत गेल्यानंतर ते बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कार्तिकने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT