विदर्भ

विद्यापीठ सुरू करणार 'बीएससी फायनान्स' 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी "करिअर ओरियंटेड' अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यातूनच विद्यापीठाने आपल्या बृहत आराखड्यात नवनवीन अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. यापैकीच एक अभ्यासक्रम म्हणजे "बीएससी फायनान्स' असून देशभरातील विद्यापीठात या अभ्यासक्रमाला बरीच मागणी आहे. 

जागतिकीकरणाच्या युगात अर्थकारणाशी संबंधित अभ्यासक्रमांनाही बरीच मागणी वाढली आहे. सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अर्थकारणाशी निगडित असलेल्या गोष्टीही शिकता याव्यात यासाठी बऱ्याच अभ्यासक्रमे तयार करण्यात आली आहे. विद्यापीठाने अशाच प्रकारचे अभ्यासक्रम तयार करून येथील विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नवनवे शॉर्टटर्म आणि पदवी अभ्यासक्रमही तयार करण्यात येत आहे. यापैकीच विज्ञानाला वाणिज्य विषयाची जोड देत "बीएससी फायनान्स' अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.

या अभ्यासक्रमात फायनान्स क्षेत्रातील विविध गोष्टी आणि "मॅथमॅटिकल मेथर्ड'चा समावेश करण्यात येणार आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेद्वारे हा अभ्यासक्रम राबविल्या जाणार आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी एका महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू असल्याने जवळपास 2020-21 पासून त्यास मान्यता देता येणे शक्‍य होणार आहे. विशेष म्हणजे हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता येथील बऱ्याच विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविल्या जात असून येत्या काळात या अभ्यासक्रमातील पदव्युत्तर अभ्यासक्रमही तयार करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT