bicycle.jpg 
विदर्भ

धक्कादायक! या अवैध व्यवसायासाठी माफियांकडून सायकलचा वापर; ‘होम डिलिव्हरी’नंतर युवकांना...

राम चौधरी

वाशीम : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण व्यापार लॉकडाऊन झालेला असताना, वाशीम शहरात व जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुटख्याचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. आता गुटख्याची ‘होम डिलिव्हरी’ करण्यासाठी गुटखा माफियांकडून चक्क सायकलद्वारे बॅगमध्ये चार ते पाच पुडे टाकून पानटपरी चालकाच्या घरपोच दोन खेपा केल्यानंतर युवकांना शंभर रुपये दिल्या जातात. गुटखा माफियांच्या या गोरखधंद्यात तस्करीचे धडे युवा वयातच दिले जात असताना, संबंधित विभाग मात्र ‘अर्थपूर्ण’ चुप्पी साधून असल्याची चर्चा शहरात केली जात आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन कोरोनामुक्त वातावरण तयार करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी-उदीम बंद आहे. मात्र, याचा फायदा घेत शहरातील गुटखा माफियांनी गुटखा विक्रीसाठी नामी शक्कल लढविल्याची माहिती आहे. या गुटखा माफियांनी झोपडपट्टी भागातील युवकांना पैशाचे आमिष देऊन गुटखा तस्करीसाठी तयार केले आहे. पाठीवर बॅग घेऊन फक्त समोर मोटरसायकलस्वाराने दाखविलेल्या घरी गुटख्याचे पुडे द्यायचे, एवढ्या कामासाठी एका खेपेला 50 रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात येते. 

या युवकांना सदरील पुड्यांमध्ये काय आहे? याची कल्पना सुद्धा नसते. हे गुटख्याचे पुडे नेऊन देण्यासाठी गुटखा माफियाच्या पंटरकडून  सायकलही उपलब्ध करून दिल्या जाते. गुटखा माफियांचा पंटर समोर तर हे महाविद्यालयीन युवक सायकलवर स्कूलबॅगमध्ये गुटख्याचे पुडे घेऊन असतात. अशी वरात शहरातील रस्त्या-रस्त्यांवर संचारबंदी शिथील काळात निघते. हा गंभीर प्रकार शहरात उघड्या डोळ्यांनी अनेक नागरिक पाहत असल्याने, गुटखा माफियांची पोच कुठपर्यंत आहे? याची प्रचिती येते, अशी शहरात चर्चा होत आहे.

दुष्टचक्रात हरविले भान
लॉकडाऊनच्या काळात अवैध गुटखा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. चौपट दराने गुटखा विक्री होत असल्याने, यामध्ये नफ्याचे प्रमाणही प्रचंड आहे. या नफ्यातील दहा टक्के भाग हा स्थानिक पातळीवरून संबंधित विभागाची तोंडे बंद करण्यासाठी खर्च करण्यात येतो. ही तोंडे बंद केलेली साखळी कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत कार्यरत आहे. मात्र, एखाद्यावेळी आपलाही मुलगा पैशाच्या लोभाने या दुष्टचक्रात अडकेल याचे भानही प्रशासनाला राहिले नाही.

कारवाईबाबत संभ्रम
अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभागाला असल्याचे सांगितल्या जाते. मात्र, अन्न व औषधी प्रशासन विभाग अजूनही अकोल्यालाच असल्याने तेथून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार होतो. जर, पोलिस विभागाला कारवाईचा अधिकार नाही तर, पोलिस विभागातील काही जणांची गुटखा माफियांसोबत असलेली उठबस प्रश्‍न निर्माण करणारी आहे. अधिकारच नाही तर, उठबसीचा उपद्व्याप कशासाठी? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अवैध बाबींवर छापा मारण्याचा अधिकार पोलिसांना आहे. नंतर फिर्याद देण्याचे काम अन्न व औषधी प्रशासन विभाग करते. मात्र, छापा मारत असताना गुटखा माफियाला आधिच माहिती मिळत असल्याने कर्तव्यदक्ष पोलिस उपअधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांचे अनेक छापे व्यर्थ ठरले आहेत. यामागे प्रशासनातील अस्तिनीतील निखारेच कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

पालकांनो सावधान...!
गुटखा माफियांच्या फायद्यासाठी महाविद्यालयीन युवकांचा वापर करणे अतिशय निंदणीय बाब आहे. मात्र, पालकांनीही सजग राहण्याची गरज आहे. आपला मुलगा काहीही काम करीत नसताना त्याच्या खिशात जर पैसे खुळखुळत असतील तर, पालकांनी त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. गुटका माफियांकडून शहरात अशा दहा ते बारा मुलांचा वापर केला जातो. प्रत्येक मुलाला दररोज दोन खेपेचे 100 रुपये दिले जातात. मुलांच्या खिशात जर पैसे येत असतील तर, पालकांसाठी ही चिंतेची बाब आहे. शाळा-महविद्यालयांना सुट्ट्या असल्याने व पालक रोज मजुरीला जात असल्याने पालकांचे लक्ष मुलांकडे राहत नाही. तरीही पालकांनी सावधान होण्याची गरज आहे.

तक्रारीवरही त्वरीत कारवाई
गुटखा तस्करीसाठी मुलांचा वापर होत असल्याबाबत तसेच कदाचीत या मुलांमध्ये कोणी अल्पवयीन असल्याचे आमच्या निदर्शनास आणून दिले तर, त्यावर पोलिस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन विभागाला कारवाई करण्यासाठी निर्देशीत केले जाईल. पालक व सर्वसामान्य नागरिकांना असला प्रकार आढळून आल्यास 1098 या निःशुल्क क्रमांकावर तक्रार करावी. तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. निनावी तक्रारीवरही त्वरीत कारवाई केली जाईल.
-सुभाष राठोड, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, वाशीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT